शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर ‘पर्यटन जिल्हा’ घोषित करा

By admin | Updated: September 17, 2015 23:44 IST

पर्यटन अभ्यासगटाचा सूर : प्रादेशिक विकास आराखडा बैठक

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा नैसर्गिक साधनसंपत्तीसह विविधतेने नटलेला आहे. येथील वातावरण पर्यटनास पूरक असल्याने तो ‘पर्यटन जिल्हा’ म्हणून घोषित करावा, असा सूर पर्यटन व पर्यावरण अभ्यासगटाच्या सदस्यांतून बुधवारी (दि. १६) उमटला.जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात जिल्ह्याच्या प्रादेशिक विकास आराखड्याबाबत चर्चा करण्यासाठी बैठक झाली. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील होते. नगररचना विभागाचे सहसंचालक एम. आर. खान, आर्किटेक्ट अमरजा निंबाळकर, बांधकाम व्यावसायिक राजीव परीख, आदींची प्रमुख उपस्थिती होती.शाहूवाडी तालुक्यातील बर्की हे गाव पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध होत आहे. मात्र, याच गावाला सहा ते आठ महिने पर्यटक कसे येतील, याचाही विचार केला जाईल, असे पर्यटन अभ्यास गटातर्फे सांगण्यात आले. जिल्ह्यातील पाणी, गड-किल्ले, नैसर्गिक साधनसंपत्ती व हिरवाईमुळे कोल्हापूर हा पर्यटनासाठी पोषक असा जिल्हा आहे. पर्यटनासोबत कृषी पर्यटनालाही चालना दिली पाहिजे. या ठिकाणी असणाऱ्या स्थानिक लोकांनाही चांगला रोजगार मिळण्याचे साधन मिळू शकते. बर्की गावात केवळ पावसाळ्यातच पर्यटक येतात. त्या ठिकाणी शून्य बजेटमध्ये सहा ते आठ महिने पर्यटक कसे येतील, याबाबत नियोजन केले जाईल. जिल्ह्यात बर्कीसारखी शेकडो गावे आहेत. त्यांचाही विकास झाला पाहिजे, असे पर्यटन अभ्यासगटाच्या प्रतिनिधींनी सांगितले. त्यावर प्रा. एन. डी. पाटील म्हणाले, सर्वसामान्य आणि स्थानिक माणसाला ज्या पर्यटनाचा फायदा होईल, असा प्रस्ताव तयार करावा. कोल्हापुरातील अनेकजण नोकरीसाठी पुणे, मुंबई किंवा इतरत्र धाव घेतात. त्यांना नोकरीचा चांगला पर्याय त्यांच्याच गावात मिळेल, असे नियोजन केले पाहिजे; तरच पर्यटन विकास आराखड्याचा हेतू साध्य होणार आहे. त्याचबरोबर पर्यटन काही कालावधीपुरतेच न चालता ते जास्तीत जास्त दिवस कसे चालेल, या दृष्टीनेही विचार व्हावा. दोनवेळचे जेवण, प्राथमिक शिक्षणासह सर्वसामान्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण होतील, अशा योजना जरूर राबविल्या पाहिजेत. मात्र, कोणत्याही योजनेमध्ये स्थानिक लोकांचा यात सहभाग नसेल तर ते अडचणीचे ठरू शकते.परीख म्हणाले, हद्दवाढीमुळे विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे ४२ गावांचा समावेश असलेला प्रस्ताव पाठवावा; कारण सध्या केलेल्या २० गावांच्या प्रस्तावांमुळे शहरासाठी अपेक्षित असणारी लोकसंख्या होणार नाही.