शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
4
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
5
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
6
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
7
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
8
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
9
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
10
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
11
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  
12
Raipur Crime: रायपूरमध्ये 'नीळ्या ड्रम'सारखी घटना, सुटकेसमध्ये सिमेंट भरुन गोठवला तरुणाचा मृतदेह
13
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
14
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
15
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
16
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
17
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
18
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
19
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
20
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल

यड्रावकर यांच्या माघारीबाबत आज निर्णय

By admin | Updated: December 11, 2015 01:14 IST

एक अर्ज पक्षातर्फे, तर एक अपक्ष अर्ज असल्याने प्रलंबित

कोल्हापूर : कोल्हापूर विधान परिषदेच्या निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व शिरोळ तालुक्यातील शरद साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या माघारीबाबत आज, शुक्रवारी निर्णय होण्याची शक्यता पक्षाच्या सूत्रांनी व्यक्त केली. यड्रावकर रिंगणातून माघार घेणार असल्याचे सांगण्यात आले.दोन्ही काँग्रेसची आघाडीचा घोळ सुरू होता म्हणून पक्षातर्फे यड्रावकर यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. पक्षाचे नेते व आमदार हसन मुश्रीफ यांनी यापूर्वीच यड्रावकर माघार घेतील, असे जाहीर केले आहे. गुरुवारी पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा अमृतमहोत्सवी सत्कार सोहळा होता. त्यास उपस्थित राहण्यासाठी कोल्हापुरातून हसन मुश्रीफ, माजी आमदार के. पी. पाटील, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, शेतकरी संघाचे अध्यक्ष युवराज पाटील आदी पदाधिकारी गेले आहेत. हे सर्व आज, शुक्रवारी कोल्हापुरात येणार आहेत. स्वत: यड्रावकर हे देखील या सत्कार सोहळ््यास गेले असल्याचे सांगण्यात आले.यड्रावकर यांनी एक अर्ज पक्षातर्फे व एक अपक्ष म्हणून भरला आहे; परंतु पक्षाने त्यांना ए, बी फॉर्म न दिल्याने त्यांचा तो अर्ज निवडणूक कार्यालयाने विचारातच घेतला नाही. अपक्ष म्हणून भरलेला अर्ज मंजूर झाला आहे. राज्यात दोन्ही काँग्रेसची आघाडी झाली आहे व त्यानुसार कोल्हापूरची जागा काँग्रेसच्या वाट्याला गेली आहे. त्यामुळे त्या आघाडीनुसार यड्रावकर हे अर्ज माघार घेतील, असे पक्षाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. याबाबत भूमिका जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मोबाईल उचलला नाही.