शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

अन्यायी तिकिटदरप्रश्नी १५ दिवसांत निर्णय

By admin | Updated: January 10, 2015 00:24 IST

मुत्नाळ ग्रामस्थांना आगारप्रमुखांची ग्वाही : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको

गडहिंग्लज : संकेश्वर ते मुत्नाळ या एका टप्प्याच्या अंतरासाठी आकारल्या जाणाऱ्या दोन टप्प्याच्या अन्यायी तिकिटदरप्रश्नी विभागीय कार्यालयाकडे पाठपुरावा करून १५ दिवसांत सकारात्मक निर्णय देण्याची ग्वाही गडहिंग्लज आगाराचे प्रमुख सुनील जाधव यांनी मुत्नाळ ग्रामस्थांना दिली. त्यामुळे याप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आयोजित रास्ता रोको आंदोलन स्थगित केले.मुत्नाळ हे गाव गडहिंग्लज ते संकेश्वर मार्गावर आहे. मुत्नाळ ते संकेश्वर हे अंतर केवळ ५ किलोमीटर असतानाही त्यासाठी १३ रूपये, तर मुत्नाळ ते गडहिंग्लज १० किलोमीटर अंतरासाठी ९ रूपये तिकिटाची आकारणी केली जाते. मुत्नाळप्रमाणेच निलजी व हेब्बाळच्या ग्रामस्थांना या अन्यायी तिकिटदर आकारणीचा भुर्दंड बसतो. याप्रश्नी ‘लोकमत’ने ‘सीमाभागातील प्रवाशांची एस.टी.कडून लूट’ या मथळ्याखालील बातमीने वाचा फोडली होती. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानीतर्फे मुत्नाळ येथे रास्ता रोकोचा इशारा देण्यात आला होता.विभाग नियंत्रकांना निवेदन देवूनही ८ दिवसांत कार्यवाही न झाल्यामुळे स्वाभिमानीचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मुत्नाळच्या बसथांब्यासमोर रास्ता रोकोसाठी जमले होते. त्याठिकाणी भेट देवून आगारप्रमुख जाधव यांनी याप्रश्नी वरिष्ठांशी संपर्क साधून सकारात्मक निर्णयाचे आश्वासन दिल्यामुळे रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले.सीमाभागातील कोगनोळी-कागल, निपाणी-अर्जूननगर, बोरगाव-इचलकरंजी, संकेश्वर-नांगनूर या ठिकाणच्या अंतरासाठी एका टप्प्याच्या तिकिटाची आकारणी केली जाते. मग, मुत्नाळसाठी वेगळा न्याय का? चुकीच्या आकारणीमुळे निलजी व हेब्बाळच्या ग्रामस्थांनाही भुर्दंड बसत आहे. याप्रश्नी निर्णय न झालेस तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा गड्यान्नावर यांनी यावेळी दिला. सरपंच आण्णासाहेब पाटील, निलाप्पा बाडकर, शिवगोंडा पाटील, हणमंतगौडा पाटील, लगमाण्णा पाटील, केंप्पाण्णा मुरगी, अर्जुन गिजवणे, केंप्पाण्णा जाधव उपस्थित होते. पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्त होता. (प्रतिनिधी)