शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

डिसेंबर-जानेवारीची पाणी बिले मे महिन्यात

By admin | Updated: May 25, 2016 00:28 IST

ग्राहकांतून संतापाची लाट : एका ‘स्पॉट बिला’ला १८ मिनिटांचा कालावधी

तानाजी पोवार -- कोल्हापूर -‘स्पॉट बिलिंग’ची अत्याधुनिक योजना असल्याने पाणी रिडिंग पाहून जागीच ग्राहकांच्या हाती बिले दिली जात असली, तरी डिसेंबर-जानेवारी महिन्यांत ‘ई’ वॉर्डातील पाणी वापराची बिले मे महिन्याच्या अखेरीस ग्राहकांच्या हाती पडू लागल्याने ग्राहकांतून संतापाची लाट पसरत आहे. संपूर्ण शहरात सुमारे एक लाख नळ कनेक्शनधारक असले, तरी त्यापैकी सुमारे ६० हजार कनेक्शनधारक ग्राहक हे एका ‘ई’ वॉर्डात आहेत. मीटर रीडर जाग्यावर येत नाही, रिडिंग न घेताच बिले वाढून येतात, आदी विविध तक्रारी वाढू लागल्याने महापालिकेच्यावतीने पाणीपुरवठा विभागाचा बिलिंग विभाग अत्याधुनिक करण्याचे ठरविले. तत्कालीन आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्या कालावधीत ही ‘स्पॉट बिलिंग’ची योजना पुढे आली; पण तांत्रिक बाबींचा विचार करता ही योजना कार्यान्वित केली नव्हती; पण बिदरी यांच्या बदलीनंतर पुन्हा ही ‘स्पॉट बिलिंग’ची योजना सुरू केली. ग्राहकाच्या दारी जाऊन तेथे ‘स्पॉट बिलिंग’ योजना राबविताना येणाऱ्या अडचणींचा प्रशासनाने कधीही विचार केला नाही. विशेष म्हणजे, ग्राहकाचे पाणी मीटर हे अडगळीत असते, ते मीटर शोधून त्याचे रिडिंग तपासून ते आॅनलाईनद्वारे बिलिंग प्रिंटरवर काढून देताना सर्व्हर कनेक्ट होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर इंटरनेटला अडथळा आला अगर त्या भागात रेंज नसल्यास सर्व्हर कनेक्ट होण्यास लागणारा विलंब हा मीटर रीडरला त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे ग्राहकांना पाण्याची बिले उशिरा मिळत आहेत.शहरात एक लाख पाण्याची कनेक्शन आहेत, तरीही त्यापैकी फक्त ‘ई’ वॉर्डात सुमारे ६० हजार कनेक्शन आहेत. ही ‘ई’ वॉर्डातील डिसेंबर-जानेवारी महिन्यांतील ‘स्पॉट बिले’ मे महिन्यात देण्याची कार्यवाही सुरूआहे. यापैकी केवळ ५० टक्के बिले दिली आहेत. याशिवाय ए, बी, सी, डी या चार वॉर्डातील सुमारे ४० हजार कनेक्शनपैकी सर्व ‘स्पॉट बिले’ दिली आहेत. सध्या त्यांना फेब्रुवारी-मार्च महिन्यांतील पाणी बिले देण्याची कार्यवाही सुरू आहे. (क्रमश:)स्वत: आयुक्तांनी काढली ‘स्पॉट बिले’‘स्पॉट बिलिंग’ची योजना मार्च महिन्यात सुरु झाल्यानंतर आयुक्त पी. शिवशंकर यांनी स्वत: गेल्या महिन्यात ‘ई’ वॉर्डात ‘स्पॉट बिलिंग’ केले. त्यावेळी सुमारे तासाभरात फक्त चार ते पाचच ‘स्पॉट बिले’ तयार झाली. ही बिले करताना सर्व्हर कनेक्ट होत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. शोधा म्हणजे सापडेलपाणी ग्राहकांच्या हाती मिळालेल्या बिलामध्ये फक्त ग्राहकाचे नाव व जोडणी नंबर आहे. ग्राहकाचा पत्ता नाही. मागील रिडिंग घेतल्याची तारीख, कनेक्शनची साईज नाही. त्यामुळे हे पाण्याचे बील कोणत्या भागातील आहे, हे समजत नाही. पूर्वीच्या पाणी बिलावर नियमावली, पाणी वापराच्या बिलाचे दर, आदी नमूद होते; पण आता ही नियमावली व दरपत्रकच गायब झाले आहे.पाण्याचे एक स्पॉट बिल परिपूर्ण करून देण्यासाठी मीटर रीडरला किमान १६ ते १८ मिनिटांचा कालावधी लागत आहे. यापूर्वी जुन्या पद्धतीनुसार एका मीटर रीडरकडे दरमहा सुमारे चार हजार कनेक्शन होती. त्यावेळी प्रतिदिन १०० ते १२५ बिले दिली जात होती. ती आता प्रत्येकाकडे अवघी २५०० इतकी आली आहेत; पण कनेक्शन कमी देण्यात आली असली तरीही त्यांना मदतनीस नसल्याने एका मीटर रीडरकडून प्रतिदिन अवघी ३० ते ३५ ‘स्पॉट बिले’च तयार होऊ लागल्यामुळे त्याचा परिणाम पाणी बिलांवर होत आहे.