शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
2
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
3
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
4
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
5
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
6
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
7
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
8
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
9
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
10
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
11
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
12
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
13
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
14
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
15
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
16
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
17
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
18
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
19
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
20
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर

नर्सिंग चालकांना ३१ डिसेंबरची डेडलाईन

By admin | Updated: December 22, 2015 00:59 IST

महापालिकेचे शिबिर : १६५ नर्सिंग होमच्या प्रतिनिधींची हजेरी; अपुऱ्या कागदपत्रांसाठी हमीपत्रे

कोल्हापूर : शहरातील दवाखाने, नर्सिंग होम यांना परवाने देण्याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत सोमवारी घेण्यात आलेल्या शिबिरात दवाखाने, नर्सिंग होमच्या सुमारे १६५ हून अधिक प्रतिनिधींनी हजेरी लावून महापालिकेकडे विविध विभागांच्या ‘ना हरकत प्रमाणपत्रां’सह कागदपत्रांच्या फाईल दाखल केल्या. ३१ डिसेंबरपर्यत शहरातील सर्व दवाखाने, नर्सिंग होम, हॉस्पिटल यांनी कागदपत्रांची पूर्तता करून न केल्यास कायदेशीर कारवाई होणार आहे. राजारामपुरीतील नगररचना कार्यालयात झालेल्या या शिबिरात दवाखाने, नर्सिंग होम परवान्यांबाबत पार्किंग, अग्निशमन यंत्रणा, बांधकाम नूतनीकरण आदींबाबत ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देण्याची यंत्रणा ‘एकाच छताखाली’ उपलब्ध करून दिली होती. कागदपत्रांची छाननी करून ती फाईल परिपूर्ण करण्याबाबत या प्रतिनिधींकडून मुदतीचे हमीपत्र देण्यात आले.राज्य शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार गेल्या काही महिन्यांपासून महापालिका प्रशासनाने शहरातील नर्सिंग होमचालकांना त्यांच्या नर्सिंग होमजवळ पार्किंग, अग्निशमन यंत्रणा उपलब्ध करून द्याव्यात म्हणून सूचना केल्या होत्या. मध्यवस्तीतील नर्सिंग होममध्ये येणाऱ्यांची वाहने स्त्यावर उभारत असल्याने त्याचा शहरवासीयांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत होता. या नर्सिंग होम, दवाखाने, कॉटेज हॉस्पिटलांना पार्किंग, अग्निशमन यंत्रणा, इमारत बांधकाम अगर नूतनीकरण परवाना, भोगवटा प्रमाणपत्रे बंधनकारक केल्याने या विविध परवान्यांसाठी संबंधित नर्सिंग होम, दवाखान्याच्या प्रतिनिधींकडून कागदपत्रांची छाननी केली. परवाना व त्या-त्या विभागांचे ‘ना हरकत प्रमाणपत्र एकाच छताखाली’ मिळवून देण्यासाठी महापालिकेच्या नगररचना व आरोग्य विभागाच्यावतीने सोमवारी दिवसभर शिबिर घेतले. विविध ‘ना हरकत प्रमाणपत्रा’बाबत यावेळी प्रतिनिधींनी मार्गदर्शन प्रत्येक विभागाच्या प्रमुखांकडून मार्गदर्शन घेऊन शंकांचे निरसन केले. ३१ डिसेंबरपर्यत शहरातील सर्व दवाखाने, नर्सिंग होम, कॉटेज हॉस्पिटल यांनी कागदपत्रांची पूर्तता करून न दिल्यास अगर त्याबाबत काही कालावधींचे हमीपत्र न दिल्यास संबंधित हॉस्पिटलवर कायदेशीर कारवाई होणार आहे. महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली चारही विभागांचे उपशहर अभियंते आर. के. मस्कर, एस. के. पाटील, एस. के. माने, हर्षवर्धन घाटगे, सहायक अभियंता व्ही. आर. पाटील, राजेंद्र वेल्हाळ, आर. के. जाधव, बी. एन. दबडे. आरोग्य लिपिक मुबारक मुजावर, नगररचना विभागाचे सहायक संचालक धनंजय खोत यांच्यासह २५ अधिकारी, कर्मचारी या शिबिरासाठी कार्यरत होते. (प्रतिनिधी)कोल्हापूर शहरातील दवाखाने, नर्सिंग होमचालकांना विविध सुविधा देणे बंधनकारक केल्याने याबाबत विविध विभागांच्या ‘ना हरकत प्रमाणपत्रा’च्या कागदपत्रांबाबत महापालिकेच्या नगररचना आणि आरोग्य विभागाच्यावतीने सोमवारी घेण्यात आलेल्या शिबिरास प्रतिसाद लाभला. या शिबिरात दवाखान्यांच्या प्रतिनिधींनी कागदपत्रांची छाननी करून घेतली.