शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

फसवणूक करणाऱ्यास सहा वर्षांनी अटक

By admin | Updated: June 28, 2016 00:43 IST

आरोपी गुडगावचा : पावणेतीन कोटींचा घातला होता गंडा; २०१० चे कापड विक्री प्रकरण

इचलकरंजी : येथील कापड व्यापारी मधुकर सुरेंद्रकुमार जैन यांना सुमारे दोन कोटी ८८ लाख रुपयाला फसविल्याप्रकरणी भुपेंदरसिंग सहानी (रा. गुडगांव, हरियाणा) याला सोमवारी गावभाग पोलिसांनी दिल्लीतील तिहार जेलमधून ताब्यात घेऊन अटक केली. २०१० मध्ये ही फसवणूक झाली होती.मधुकर जैन यांचे येथील कापड मार्केटमध्ये राजलक्ष्मी सिंथेटिक्स नावाने कापड खरेदी-विक्रीची फर्म आहे. त्यामार्फत ते शहर परिसरातील यंत्रमागधारकांकडून कापड खरेदी करून दलालामार्फत व्यापाऱ्यांना विक्री करतात. सन २००६ मध्ये दिल्ली येथील दलाल कैलास मल्होत्रा यांनी कुटान्स रिटेल इंडिया लिमिटेड, गुडगाव (हरियाणा) कंपनीचे सरव्यवस्थापक भुपेंदरसिंग सहानी याची ओळख करून दिली. या ओळखीमधून सहानी यांनी जैन यांच्याकडून मार्च २००९ ते मे २००९ या कालावधीत दोन कोटी रुपये किमतीच्या कापडाची आॅर्डर दिली.त्यातील पहिल्या टप्प्यातील ५० लाख रुपये जैन यांना मिळाले. त्यानंतर ९ आॅगस्ट २००९ ते ३० मार्च २०१० पर्यंत एक कोटी ३७ लाख ८२ हजार १३६ रुपये व एक कोटी ५३ लाख २० हजार ६६३ रुपयांचे कापड पाठविले. त्याचे बिल कंपनीने इंडियन्स ओव्हरसीज बॅँक, शाखा नवी दिल्ली या बॅँकेचे ३७ धनादेश दिले. मात्र, हे धनादेश वटलेच नाहीत. त्यानंतर सहानी यांनी कंपनीचे दुसरीकडे खाते काढण्याचे काम सुरू असल्याचे सांगून वेळ मारून नेली. त्यानंतर जैन यांचे भाऊ संतोष यांनी कंपनीचे अध्यक्ष देवेंदर पालसिंह कोहली व कंपनीचे संचालक गुरुमितसिंह साहनी यांना भेटून पैशांची मागणी केली. मात्र, तिघांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे दोन कोटी ८८ लाख ९० हजार ९७० रुपयांची आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने जैन यांनी पोलिसांत धाव घेतली व तिघांविरोधात फसवणुकीची तक्रार दिली होती. त्यानुसार कारवाई करीत पोलिसांनी सोमवारी भुपेंदरसिंग सहानी याला अटक केली आहे. (वार्ताहर)