शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

शिंगणापूरच्या अक्षयने जिंकली डेक्कन क्लिप

By admin | Updated: November 9, 2016 01:35 IST

तब्बल २५ तास १३. मि. सलग सायकलिंग

प्रकाश पाटील -- कोपार्डेकोल्हापूरच्या पश्चिमेला अवघ्या ५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शिंगणापूर (ता. करवीर) येथील अक्षय उद्धव चौगले याने सलग २५ तास १३ मिनिट पुणे ते गोवा ही सायकलिंगमधील ६४३ कि.मी. ची डेक्कन क्लिप हँगर स्पर्धा जिंकून क्रीडाक्षेत्रातील नव्या क्षेत्रात मानाचा तुरा रोवला.डेक्कन क्लिप हँगर स्पर्धेचा मार्ग एवढा कठीण आहे. पुणे, महाबळेश्वर, सातारा, कोल्हापूर, बेळगाव, धारवाड, अनमोड घाट, वास्को, गोवा असे ६४३ कि.मी.चे अंतर आहे. यात चार ते पाच घाट. या घाटातील ५० कि.मी. चा मार्ग तर अत्यंत खडतर व आव्हानात्मकच आहे. अक्षयने सोले गटातून ओपन विभागातून भाग घेतला होता. शनिवारी (दि. ५) पहाटे ४ वाजून ४५ मिनिटांनी या स्पर्धेला प्रारंभ झाला. सलगपणे २५ तास १३ मिनिटे सायकलिंग करून गोव्यात रविवारी (दि. ६) सकाळी ५ वाजून ४५ मिनिटांनी प्रथम पोहोचल्यानंतर स्पर्धेचा मानकरी म्हणून झालेला आनंद अवर्णनीय होता. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी लागणाऱ्या हायटेक्निकच्या सायकलचा प्रश्न समोर असताना मित्राने आपली लाखो रुपयंची सायकल या स्पर्धेसाठी उपलब्ध करून देऊन मोठी मदत केल्याचे अक्षय याने सांगितले.डेक्कन क्लिप हँगर या मानाच्या स्पर्धेत अक्षय हा पहिला सायकलपटू होणारा व विजेताही ठरला आहे. या स्पर्धेत देशासह परदेशातीलही मातब्बर सायकलपटूंनी भाग घेतला होता. तरीही यात आपले कसब पणाला लावून अक्षयने ही स्पर्धा जिंकून कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्रात मानाचा तुरा खोवला आहे.अक्षयच्या या यशामागे मोठे कष्ट आहेत. तो दररोज शिंगणापूर ते निपाणी तवंदी घाटपर्यंत व तेथून पुन्हा शिंगणापूर असा १२५ ते १४० कि.मी.चा सायकलवरून सराव करतो. त्याचा आहारसुद्धा शाकाहारी आहे. या स्पर्धेच्या मार्गातील खंबाटकी, महाबळेश्वर, अनमोड घाट फारच परीक्षा घेणारे ठरल्याचे सांगताना आकाश कोरगाव, कपिल कोळी व अनुप परमाळे यांचे मार्गदर्शन व साह्य मोलाचे ठरल्याचेही अक्षयने यावेळी नमूद केले.मागील वर्षी मलेशियात झालेल्या आर्यनमॅन स्पर्धेत १८२ कि.मी. सायकलिंग, जलतरण व ४२ कि़मी. धावणे अवघ्या १४ तास ३६ मि. पूर्ण करत अक्षयने प्रभावी कामगिरी केली होती.पुणे-गोवा दरम्यान डेक्कन क्लिप हँगर या ६४३ कि़ मी. अंतराच्या स्पर्धेतील एक क्षण. अक्षयने ही स्पर्धा जिंकली.