शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफी : सरकारकडून दिशाभूल

By admin | Updated: April 24, 2017 01:12 IST

सतेज पाटील : बहुमताच्या जोरावर भाजपची रेटारेटी; संघर्ष यात्रेसाठी उपस्थितीचे आवाहन

कोल्हापूर : वास्तविक राज्यातील शेतकऱ्यांची मागणी पाहता अधिवेशनातच कर्जमाफीचा निर्णय जाहीर होईल, असे आम्हाला वाटले होते; परंतु सरकारकडून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असून बहुमताच्या जोरावर भाजपने रेटारेटी सुरू केली असल्याचा आरोप माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केला. मंगळवारी जिल्ह्णात होणाऱ्या संघर्ष यात्रेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस समितीमध्ये रविवारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष व अन्य पक्षांनी एकत्र काढलेल्या संघर्ष यात्रेचे मंगळवारी कोल्हापूर जिल्ह्णात आगमन होणार आहे. सकाळी शाहू जन्मस्थळी अभिवादन, अंबाबाईला साकडे घालून यात्रा मुदाळ येथे जाणार आहे. तेथे आजरा, गडहिंग्लज, चंदगड, राधानगरी, कागल, भुदरगड या सहा तालुक्यांची सभा होणार आहे. त्यानंतर दुपारी ३ वाजता येथील दसरा चौकात सभा होणार आहे. संध्याकाळी जयसिंगपूर येथे सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर सतेज पाटील म्हणाले, शेतकरी गेली १०० वर्षे कर्ज काढत आला आहे. मात्र, ऊठसूठ कोणी कर्जमाफी मागितली नाही; परंतु गेली तीन वर्षे दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ही मागणी आम्ही केली; परंतु यासाठी भांडणाऱ्या आमच्या १९ आमदारांना निलंबित केल्यानंतर आम्हाला शेवटी जनतेच्या न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय राहिला नाही. कर्जमाफी करायची नसल्याने भाजपकडून आता लोकांची दिशाभूल सुरू होईल. नको ते विषय पुढे आणले जातील. गोबेल्स नीतीने वेगळे वातावरण निर्माण केले जाईल. त्यामुळे आता या सगळ्याला बळी न पडता शेतकऱ्यांच्या हितासाठी काढण्यात आलेल्या संघर्ष यात्रेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहा. करवीर तालुकाध्यक्ष शंकर पाटील यांनी स्वागत गेले. प्रदेश सचिव तौफिक मुल्लाणी यांनी प्रास्ताविकामध्ये राजयातील या संघर्ष यात्रेचा आढावा घेतला. यावेळी शशांक बावचकर, बजरंग पाटील, संजय पाटील यांची भाषणे झाली. यावेळी महिला जिल्हाध्यक्षा अंजना रेडेकर, इचलकरंजीचे शहराध्यक्ष प्रकाश मोरे, शिरोळ तालुकाध्यक्ष सर्जेराव शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेश आपटे, शशिकांत खोत, सचिन चव्हाण, विद्याधर गुरबे, विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.