शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
5
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
6
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
7
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
8
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
9
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
10
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
11
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
12
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
13
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
14
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
15
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
16
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
17
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
18
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
19
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा

कर्जमाफीने शेतकºयांचा सातबारा कोरा होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 00:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : महाराष्टÑ सरकारने ऐतिहासिक कर्जमाफी करून राज्यातील शेतकºयांना दिलासा दिला असून यामुळे त्यांचा सातबारा कोरा होणार आहे. त्यामुळे हे शेतकरी नवीन कर्ज मिळण्यास पात्र झाले आहेत, असे प्रतिपादन कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मंगळवारी येथे केले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महाराणी ताराराणी सभागृहात आयोजित शिष्यवृत्ती वितरण व सत्कार समारंभात ते बोलत ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : महाराष्टÑ सरकारने ऐतिहासिक कर्जमाफी करून राज्यातील शेतकºयांना दिलासा दिला असून यामुळे त्यांचा सातबारा कोरा होणार आहे. त्यामुळे हे शेतकरी नवीन कर्ज मिळण्यास पात्र झाले आहेत, असे प्रतिपादन कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मंगळवारी येथे केले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महाराणी ताराराणी सभागृहात आयोजित शिष्यवृत्ती वितरण व सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी मंत्री खोत व जिल्हाधिकाºयांनी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांना गुलाबपुष्प देऊन स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.मंत्री खोत म्हणाले, महाराष्टÑ सरकारने ऐतिहासिक कर्जमाफी करून राज्यातील शेतकºयांना मोठा दिलासा दिला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकºयांचा सातबारा कोरा होणार असून हे शेतकरी नव्याने कर्ज मिळण्यास पात्र झाले आहेत. कजर्माफीमुळे त्यांचा आनंद आणखी द्विगुणित झाला आहे. शेतकºयांच्या उत्पादनात वाढ करून त्यांना अधिक सक्षम, सधन करण्यासाठी शासन अनेक नवनवीन योजना राबवत आहेत याचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा.यावेळी मंत्री खोत यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०१७ मध्ये गुणवत्ता प्राप्त करणाºया विद्यार्थ्यांमध्ये तन्वी संतोष शिवणे (प्रथम), पर्वणी चतुर्धन नीळकंठ (द्वितीय), सौजन्या युवराज चव्हाण (द्वितीय), सृष्टी विद्यासागर होनमाने (तृतीय) यांचा सत्कार करण्यात आला. कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शाळा परीक्षेमध्ये गुणवत्ता प्राप्त करणाºया विद्यार्थ्यांमध्ये वर्धन धनाजी माळी, नरेंद्र संजय दाभोळकर, श्वेता सदानंद बाळेकुंद्री, प्रथमेश राजीव जरग, प्रथमेश मलकारे आरगे, पार्थ कृष्णात पाटील, केतन कृष्णात संकपाळ, आर्षद मुबारक नाकाडे, आर्या राजाराम तळप, समृद्धी मनोज कुलकर्णी, संचिता सचिन पाटील यांचा सत्कार करण्यात आला तसेच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाºया डॉ. भारती अभ्यंकर आणि डॉ. लीला सुनील महापुरे यांचा, सामाजिक वनीकरण विभागांतर्गत उत्कृष्ट काम करणाºया अमित दळवी, राजू सूर्यवंशी, पॉवर फॉर पीपल्स फाऊंडेशन (गारगोटी), इचलकरंजी नगरपालिका, धनंजय नामदेव सावंत यांचा सत्कार करण्यात आला.निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी प्रास्ताविक केले. नायब तहसीलदार प्रकाश दगडे यांनी आभार मानले.जिल्ह्यातील २१६ पाणंद रस्ते झाले मोकळेसातबारा संगणकीकरणाची मोहिमेत जिल्हा आघाडीवर असून ९६ टक्के काम पूर्ण झाले आहे. ‘महाराजस्व अभियान’च्या माध्यमातून ३ लाख ६९ हजार ५२ दाखले वितरित करण्यात आले तर जवळपास २४० किलोमीटर लांबीचे २१६ अतिक्रमित पाणंद, शिवार रस्ते गेल्या वर्षभरात मोकळे केले आहेत. त्याचा ग्रामीण जनतेला मोठ्या प्रमाणावर लाभ मिळत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्णात रस्ते सुधारणा, रूंदीकरण, नवीन रस्ते, पुलांच्या कामांना प्राधान्य दिले आहे, असे खोत यांनी सांगितले.२९, ३० आॅगस्टला महाअवयवदान अभियानगेल्या तीन वर्षांत जिल्हा वार्षिक योजना, अनुसूचित जाती उपयोजनेमध्येही भरघोस निधी प्राप्त होत मोठ्या प्रमाणात कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगून २९ व ३० आॅगस्टला महाअवयवदान अभियान राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन खोत यांनी केले.‘जलयुक्त’मधून ९ हजार टीसीएम पाणीजिल्ह्णात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गत दोन वर्षांत ५२ कोटी रुपये खर्च करून १ हजार ६८८ कामे करण्यात येत आहेत. आतापर्यंत त्यातून सुमारे ९ हजार टीसीएमपेक्षा जास्त पाणी साठवण क्षमता निर्माण झाली आहे, ही बाब कौतुकास्पद असल्याचे खोत यांनी सांगितले.