शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीने शेतकऱ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 01:04 IST

कोल्हापूर : राज्य शासनाने कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेऊन राज्यातील शेतकºयांना खºया अर्थाने दिलासा दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील १ लाख ८८ हजार शेतकºयांना ३७६ कोटींची कर्जमाफी दिल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी दिली.भारतीय स्टेट बँकेच्या क्षेत्रीय व्यवसाय कार्यालयाच्यावतीने कणेरी मठामध्ये आयोजित शेतकरी व बचत गटांच्या महिला मेळाव्यात ते बोलत होते. ...

कोल्हापूर : राज्य शासनाने कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेऊन राज्यातील शेतकºयांना खºया अर्थाने दिलासा दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील १ लाख ८८ हजार शेतकºयांना ३७६ कोटींची कर्जमाफी दिल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी दिली.भारतीय स्टेट बँकेच्या क्षेत्रीय व्यवसाय कार्यालयाच्यावतीने कणेरी मठामध्ये आयोजित शेतकरी व बचत गटांच्या महिला मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमास स्टेट बँकेचे जनरल मॅनेजर बलदेव प्रकाश, संतोषकुमार महापात्रा यांच्यासह मान्यवर, अधिकारी उपस्थित होते.पालकमंत्री पाटील म्हणाले, राज्यातील सुमारे ३७ लाख शेतकºयांना कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर योजनेचा लाभ मिळाला आहे. राज्यातील शेतकरी कर्जमुक्त व्हावा, अशी शासनाची इच्छा आहे. कर्जमाफीच्या कामी स्टेट बँक आॅफ इंडियासह अन्य सर्वच बँकांनी सक्रिय योगदान देऊन शेतकºयांना सहाय्यभूत होण्यासाठी मदत केली आहे. बँकांनी शेतकºयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.उत्कृष्ट शेतकरी तसेच बचत गटातील महिलांचा सत्कार मंत्री पाटील यांच्या हस्ते केला. स्वागत व प्रास्ताविकात स्टेट बँकेचे जनरल मॅनेजर बलदेव प्रकाश यांनी तसेच शेतकरी सदाशिव चौगुले यांनीही मनोगत व्यक्त केले.समारंभास कृषी सहसंचालक उमेश पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, जिल्हा अग्रणी प्रबंधक राहुल माने यांच्यासह मान्यवर, बँकेचे व कृषी विभागाचे अधिकारी, शेतकरी आणि बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.बचत गटासाठी मॉलमहिला बचत गटांच्या उत्पादनाला बाजारपेठा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर लवकरच महिला बचत गटांसाठी मॉल उभारण्याचा संकल्प असून याठिकाणी महिला बचत गटाच्या उत्पादनांना विक्रीसाठी स्टॉल्स उपलब्ध करून दिले जातील. जिल्ह्यात सात तालुका विक्री केंद्राच्या उभारणीला गती दिली असून २ विक्री केंद्रे पूर्ण झाल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.