शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

दलबदलूंवर नियंत्रण ठेवणे आवश्यकच

By admin | Updated: August 11, 2014 22:42 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी

मांजर्डे : इतर पक्षांतून महायुतीत येणाऱ्यांवर नियंत्रण व लक्ष ठेवले आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवले तरच आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीची सत्ता येईल, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी आरवडे (ता. तासगाव) येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात व्यक्त केले.आरवडे येथे रविवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी खासदार संजयकाका पाटील उपस्थित होते. खासदार शेट्टी म्हणाले की, लोकसभेत मोदी लाटेवर स्वार होऊन आज अनेकजण महायुतीत येण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा दलबदलूंवर वेळीच नियंत्रण ठेवले नाही, तर राज्यात महायुतीची सत्ता येणार नाही. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यास उमेदवारी देण्यात यावी. राज्यातील जनतेला काँग्रेस आघाडीने फसवले आहे. सहकार मोडीत काढण्याचे पाप केले आहे. ७००० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. शरद पवार शेतकऱ्यांऐवजी कारखानदार, घोटाळेबहाद्दरांना संरक्षण देऊन राजकारण करीत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत आघाडीची वाताहत होईल. महायुतीत सर्वांना एकत्र घेऊन काम करणाऱ्या व प्रामाणिकपणे पक्षाचा झेंडा घेऊन कार्य करणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी देण्याचा निर्णय चर्चेतून घेऊ.महेश खराडे म्हणाले की, गृहमंत्री पाटील यांनी विसापूर-पुणदी उपसा सिंचन योजना करताना स्वत:च्या मतदार संघातील काम लवकर केले. परंतु शेजारच्या मतदार संघातील काम मागे ठेवून विसापूर भागातील जनतेवर अन्याय केला आहे. संदीप राजोबा, सयाजी मोरे, बी. जी. पाटील, प्राचार्य प्रकाश जाधव, जोतिराम जाधव यांचीही भाषणे झाली. यावेळी कवठेमहांकाळ तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील, मिरज तालुकाध्यक्ष महावीर पाटील, जयकुमार कोले, हरिष खराडे, पोपट मोरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड उपस्थित होते. अनिल पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)एका व्यासपीठावर या...खा. पाटील म्हणाले की, तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी २५ वर्षे भुलवून निवडणुका लढविल्या आहेत. ज्या जनतेने जिल्हा परिषद सदस्यापासून उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचविले, त्या जनतेवर त्यांनी मानसिक गुलामगिरी लादली आहे. विसापूर-पुणदी योजना, तासगाव कारखान्याबाबत त्यांनी एका व्यासपीठावर येऊन चर्चा करावी.