शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यू तापाच्या बैठकीत वाद, गोंधळ, चकमक

By admin | Updated: May 8, 2016 00:49 IST

इचलकरंजी पालिकेतील प्रकार : नगरसेवक, मुख्याधिकारी यांच्यात संघर्ष

इचलकरंजी : शहरामध्ये डेंग्यू तापाचे रुग्ण आढळू लागल्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत मृतांच्या नातेवाइकांना अर्थसहाय्य आणि प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांचा उपचार खर्च देण्याच्या मागणीवरून शनिवारी नगरसेवक संजय तेलनाडे व अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. पालिकेच्या सभागृहात चालू असलेल्या या बैठकीत त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. त्यातच नगरसेवक अब्राहम आवळे यांनी लालनगर परिसराच्या स्वच्छतेचा प्रश्न उपस्थित करून नगराध्यक्षांच्या टेबलवर कचरा टाकून संताप व्यक्त केला. यावेळी काही काळ गोंधळ उडाला होता. मात्र, ज्येष्ठ नगरसेवकांनी हस्तक्षेप करून चर्चेने यावर उपाययोजना करण्याचे ठरविले. नगरपालिकेच्या सभागृहामध्ये नगराध्यक्ष शुभांगी बिरंजे यांच्या अध्यक्षतेखाली डेंग्यू तापावर प्रतिबंधक उपाययोजना करण्याविषयीची बैठक झाली. बैठकीसाठी उपनगराध्यक्ष महावीर जैन, आरोग्य व स्वच्छता समितीच्या सभापती भक्ती बोंगार्डे, नागरी आरोग्य अभियानाचे प्रभारी डॉ. पवन म्हेत्रे, आयजीएम रुग्णालयाचे डॉ. गौरीप्रसाद वेताळ, अधिकारी उपस्थित होते. आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार यांनी परिस्थितीची माहिती दिली. मलेरिया प्रतिबंधक योजनेचे अधिकारी डॉ. किरण जाधव यांनी स्लाईड शोच्या माध्यमातून डेंग्यू रोगाबाबत सविस्तर माहिती दिली. त्यानंतर झालेल्या चर्चेमध्ये उपनगराध्यक्ष जैन, कॉँग्रेसचे गटनेते बाळासाहेब कलागते, नगरसेवक शशांक बावचकर, रवी रजपुते, आदींनी शहराच्या विविध परिसरातील अस्वच्छतेबाबत प्रशासनाला अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडले. डेंग्यू तापामुळे मृत झालेल्या नातेवाईकांना आणि औषधोपचार घेतलेल्या रुग्णांना अर्थसहाय्य देण्यात यावे, अशी मागणी बहुतांशी नगरसेवकांनी केली. त्यावर नगराध्यक्ष बिरंजे यांनी या विषयाबाबत नगरपालिका सभेमध्ये प्रस्ताव मंजूर करण्यात येईल, असे सांगितले. यावेळी नगरसेवक काही शंका विचारत असताना नगरसेवक तेलनाडे यांनी काही प्रश्न विचारले. त्या प्रश्नांना उत्तर देताना अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांनी आर्थिक विषय मंजूर करण्याचा आपल्याला अधिकार नाही, असे सांगितले. यावरून नगरसेवक तेलनाडे व पोतदार यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. मात्र, ज्येष्ठ नगरसेवकांनी वाद संपुष्टात आणला. (प्रतिनिधी)