कोल्हापूर : मंडलिक वसाहतीतील सदाशिव बाबूराव मंडलिक (वय ७९) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, विवाहित मुलगी, नातवंडे, भाऊ असा मोठा परिवार आहे. ‘के.एस.ए.’चे मानद सरचिटणीस माणिक मंडलिक व मानसिंग ऊर्फ बाजीराव मंडलिक यांचे ते ज्येष्ठ बंधू होत. रक्षाविसर्जन आज, रविवारी आहे.
दिनकर माने
कोल्हापूर : साठमारी गल्ली, मंगळवार पेठेतील दिनकर दत्तात्रय माने (वय ८०) यांचे निधन झाले. ते पुण्यातून सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंता म्हणून निवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, रविवारी पंचगंगा स्मशानभूमी येथे आहे.
ताराबाई उलपे
कोल्हापूर : शिवाजी पेठ, मरगाई गल्लीतील ताराबाई यशवंत उलपे (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात जाऊ, दीर, भाऊ, बहिणी, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे. त्या महापालिकेचे सेवानिवृत्त जकात निरीक्षक नामदेव सूर्यवंशी यांच्या ज्येष्ठ भगिनी होत. रक्षाविसर्जन आज, रविवारी आहे.
सुशीला पाटील
कोल्हापूर : सम्राटनगर, नलवडे काॅलनीतील सुशीला दत्तात्रय पाटील (वय ७१) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, रविवारी आहे.
माणिकराव चव्हाण-देसाई
कोल्हापूर : म्हाळुंगे (ता. करवीर) येथील माजी सरपंच माणिकराव रामचंद्र चव्हाण-देसाई (वय ६९) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, विवाहित मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते सेवानिवृत्त सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी शशिकांत पडवळ यांचे व्याही होत. रक्षाविसर्जन आज, रविवारी म्हाळुंगे येथे आहे.
(सर्व निधन वार्ता फोटो आहेत.)