कोल्हापूर : मंगळवार पेठ, सणगर गल्लीतील अशोक ऊर्फ बाळासाहेब सदाशिव मुळीक (वय ७१) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, बहिणी असा परिवार आहे. आज, सोमवारी रक्षाविसर्जन आहे. ते सणगर गल्ली तालीम व बोडके तालमीचे ज्येष्ठ कार्यकर्ते होते.
शशिकांत पाटील
कोल्हापूर : शिवाजी पेठेतील निवृत्ती चौकातील शशिकांत मारुतराव पाटील (वय ६०) यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, दोन भाऊ, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, सोमवारी आहे.
आनंदीबाई शिंदे
कोल्हापूर : पाचगाव, पोस्टल काॅलनीतील आनंदीबाई वसंतराव शिंदे (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, तीन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. आज, सोमवारी रक्षाविसर्जन आहे.
रमेश जाधव
कोल्हापूर : न्यू पॅलेस परिसरातील रहिवासी रमेश आत्माराम जाधव (वय ७८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
(सर्व निधन वार्ता फोटो आहेत)