निवृत्तिवेतनधारक ज्या बँकेत निवृत्ती वेतन घेतात त्यांच्यामार्फत कोषागार, पंचायत समितीला दरवर्षी नोव्हेंबरमध्ये हयातीचे दाखले जमा करणे बंधनकारक आहे. यावेळी कोरोनामुळे दाखले जमा करण्यास अडचणी आल्या. त्यामुळे दाखले जमा करण्याची मुदत ३१ डिसेंबर २०२० पर्यंत वाढविण्यात आली आहे. कोषागारांकडून निवृत्तिवेतन हयातीच्या दाखल्यांबाबत संबंधित सर्व बँकांना यादी पाठविली आहे. या यादीतील नावासमोर स्वाक्षरी करून याची पूर्ताता करता येणार आहे तसेच जीवन पोर्टलमार्फत, पूर्वीप्रमाणे बँकेमार्फत, प्रत्यक्ष कोषागांरांत किंवा पंचायत समिती कार्यालयात जावून अथवा पोस्टाद्वारे हयातीचे दाखले जमा करता येणार आहेत.
ह्यातीचे दाखले ३१ डिसेंबरपर्यंत देण्याची मुदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:52 IST