कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच क्षेत्रात अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यास वाहतूक क्षेत्र ही अपवाद राहिलेले नाही. त्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयानेही वाहनांच्या कागदपत्रांच्या नूतनीकरणास ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा विचार करून केंद्र व राज्य सरकारने संचारबंदी व लाॅकडाऊन जाहीर केले आहे. त्यात वाढता संसर्गामुळे नागरिकांना दैनंदिन कामकाजही करणे शक्य नाही. या सर्वाचा विचार करून केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने देशातील सर्व परिवहन आयुक्त कार्यालयाने वाहनांच्या कागदपत्रांची कामे ३० जून २०२१ पर्यंत वाढवून दिली आहे. यात सर्व कागदपत्रांचा समावेश आहे. ज्यात लायसेन्स, वाहनांचा फिटनेस, सर्व प्रकारचे परवाने त्यांच्या नोंदणीबाबतची आदी कामांचा समवेश आहे. विशेष म्हणजे ज्या वाहनधारकांची अशा कामांची मुदत जरी १ फेब्रुवारी २०२० ला संपली असली तरी त्यांनाही वाढीव मुदतीची सवलत देण्यात आली आहे. यांची नोंद वाहनधारक, वाहनचालक व तपासणी अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी डाॅ. स्टीव्हन अल्वारीस यांनी केले आहे.