शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

सूत्रधाराला पकडण्यासाठी ५ सप्टेंबरची ‘डेडलाईन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2016 01:27 IST

पाटणकरांचा इशारा : श्रमिक मुक्ती दल आणि समविचारी संघटनांचा मेळावा

कोल्हापूर : डॉ. दाभोलकर, पानसरे व कलबुर्गी यांच्या खूनप्रकरणी खुन्याला आणि सूत्रधाराला शोधण्यासाठी पोलिसांनी तपास मोहिमेत वेग घेतला नसल्यानेच जनतेची ‘कोम्ब्ािंग आॅपरेशन’ मोहीम हाती घेण्याची वेळ आली आहे; पण तत्पूर्वी मुंबईत ‘सीबीआय’ने वीरेंद्र तावडे याला अटक केल्यामुळे पोलिसांना तपासाची दिशा मिळाली असून, त्याची गती आणखी वाढवावी, असे आवाहन करीत, येत्या ५ सप्टेंबरपर्यंत खरा खुनी आणि सूत्रधाराला न पकडल्यास कऱ्हाड येथे लाखोंच्या संख्येने राज्यस्तरीय मेळावा घेऊन जनतेच्या इशाऱ्याने ‘कोम्बिंग आॅपरेशन’ सुरू करणार असल्याचा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी दिला. श्रमिक मुक्ती दल आणि समविचारी संघटनांतर्फे डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. एम. एम. कलबुर्गी यांचे खुनी व सूत्रधार शोधण्याचे जनतेचे कोम्बिंग आॅपरेशन सुरू करण्याबाबत शनिवारी येथील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे जनतेचा निर्णायक मेळावा झाला. त्याप्रसंगी बोलताना डॉ. पाटणकर यांनी हा इशारा दिला. तीन खून झाले. आता चौथा खून होणार, असे सनातन संस्थेचे डॉ. आठवले म्हणाल्याचे ‘सीबीआय’ने एका वृत्तपत्राला सांगितले; पण चौथा खून होणार या पार्श्वभूमीवर ‘सनातन’च्या अश्रमाची तपासणी होत नाही व मुख्यमंत्रीही गप्प का? असा प्रश्न डॉ. पाटणकर यांनी केला. चौथा खून होणार म्हटलेल्यांची गृहविभागाने चौकशी करावी. २४ मार्च रोजीच्या मोर्चाच्या इशाऱ्यानंतर समीर गायकवाडला पकडले, तर जनतेच्या ‘कोम्बिंग आॅपरेशन’च्या इशाऱ्यानंतर मुंबईत वीरेंद्र तावडेला पकडले आहे. त्यामुळे आमचे ‘कोम्बिंग आॅपरेशन’ तूर्त आम्ही थांबवतो; पण पोलिस खात्याने तपासाची गती वाढविली पाहिजे. त्यासाठी पोलिस खात्याला खरा खुनी व सूत्रधार पकडण्यासाठी ५ सप्टेंबरची डेडलाईन देण्यात येत आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनीही बैठकीसाठी तारीख द्यावी; अन्यथा त्याच दिवशी कऱ्हाड येथे श्रमिक मुक्ती दल आणि समविचारी संघटनांचा राज्यस्तरीय मेळावा घेऊन केव्हाही अचानक ‘कोम्बिंग आॅपरेशन’ करणार असल्याचाही इशारा पाटणकर यांनी दिला. यावेळी मोहनराव यादव, आनंदराव पाटील, ज. रा. दाभोळे, नंदकुमार गोंधळी, आदींची भाषणे झाली.