शहरं
Join us  
Trending Stories
1
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
2
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
3
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
4
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?
5
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
6
IPL 2025: SRHचा हर्षल पटेल ठरला मलिंगा-बुमराहपेक्षाही 'वेगवान'; केला ऐतिहासिक पराक्रम
7
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
8
धक्कादायक! तुमच्या जवळच्या 'या' ७ गोष्टी टॉयलेट सीटपेक्षाही घाणेरड्या; लपलेत लाखो बॅक्टेरिया
9
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
10
Tamil Nadu Landslide: मोठी दुर्घटना! तामिळनाडूत दगड खाणीत भूस्खलन झाल्याने ४ कामगार ठार, एक जखमी
11
'आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं...'; राज ठाकरेंची जयंत नारळीकरांबद्दल पोस्ट
12
२०२५ मध्ये शनैश्चर जयंती कधी आहे? ‘या’ गोष्टी आवर्जून करा; पाहा, महत्त्व, महात्म्य, मान्यता
13
अखेर परेश रावल यांनी सांगितलं 'हेरा फेरी ३' सोडण्यामागचं कारण; म्हणाले, "मला ही भूमिका..."
14
Jyoti Malhotra : 'लव्ह यू खुशमुश'...! ज्योतीला पोलीस घरी घेऊन गेले, ती रुममधून बाहेर पडताच पोलिसांना पत्र मिळाले
15
‘या’ ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, अखंडित सेवा करा; स्वामी शुभफल देतील, अढळ विश्वास असू द्या!
16
मदरशांत ऑपरेशन सिंदूरचे धडे शिकविले जाणार; उत्तराखंड सरकारचा निर्णय
17
प्लास्टिक, काच की स्टील... फ्रिजमध्ये कोणती पाण्याची बाटली ठेवणं आरोग्यासाठी फायदेशीर?
18
"खरंतर शरीफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेलेल्यांना निशान ए पाकिस्तान मिळाला पाहिजे’’, काँग्रेसचा टोला   
19
पक्के घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण होणार! PM आवास योजनेची मुदत वाढवली, कशी आहे प्रक्रिया?
20
१८ महिन्यांनी राहु-केतु गोचर: शनीशी अशुभ युती संपणार; ८ राशींना बंपर लाभ होणार, शुभच घडणार!

बाजार समितीमध्ये ‘डीसीसी’चाच फॉर्म्युला

By admin | Updated: May 10, 2015 00:48 IST

राजकीय जुळवाजुळव : दीड महिन्यात निवडणूक, मतदारांमध्ये जत तालुक्याचे वर्चस्व

अंजर अथणीकर / सांगली सांगली जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीची प्रारूप मतदारयादी जाहीर झाल्याने आगामी दीड महिन्यात निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. गेल्या सात वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्याने, राजकीय पक्ष आणि नेतेमंडळी या निवडणुकीतही जिल्हा मध्यवर्ती बँकेचाच फॉर्म्युला वापरण्याची शक्यता राजकीत वर्तुळातून व्यक्त होत आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पाच गटामध्ये होते. त्यानुसार सहकारी संस्था मतदार संघामध्ये २६६८, ग्रामपंचायत मतदार संघामधून २२८६ व हमाल, तोलाईदार मतदार संघातून १५८० मतदार आहेत. त्याचबरोबर व्यापारी मतदार संघामध्ये १३०६ व प्रक्रिया किंवा खरेदी-विक्री संघातून ३७५ मतदार आहेत. एकूण ८ हजार २२५ मतदार आहेत. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीवर गेल्या अडीच वर्षापासून प्रशासक नियुक्त आहेत. येत्या १५ मेपर्यंत अंतिम मतदारयादी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जूनच्या शेवटच्या किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, यावेळी विकास सोसायट्यांचे संचालक सरसकट १७ वरून १३ करण्यात आल्याने मतदार संख्येतही घट झाली आहे. यामध्ये सर्वाधिक मतदार जत तालुक्यातील आहेत. सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती ही जिल्ह्यातील सर्वात मोठी संस्था आहे. मिरज, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यात याचा विस्तार आहे. या संस्थेवर तसे वसंतदादा घराण्याचेच ५६ वर्षे वर्चस्व होते. सुरुवातीला वसंतदादा पाटील, त्यानंतर विष्णुअण्णा व नंतर मदन पाटील गटाचीच सत्ता राहिली. याला अपवाद केवळ गतवेळची निवडणूक राहिली. २००८ च्या निवडणुकीत परिवर्तन पॅनेलच्या झेंड्याखाली जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली माजी मंत्री अजितराव घोरपडे, संजयकाका पाटील, माजी आमदार दिनकर पाटील, माजी आमदार संभाजी पवार हे एकत्रित आले. राष्ट्रवादी, भाजपच्या या पॅनेलला पतंगराव कदम गटाचीही साथ मिळाली. ही निवडणूक मदन पाटील विरुध्द सर्वजण अशी झाली. चुरशीच्या निवडणुकीनंतर या संस्थेत पहिल्यांदाच परिवर्तन घडून आले. मात्र या पॅनेलचा कालावधी पूर्ण होण्याआधीच संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्यात आला. गेल्या अडीच वर्षापासून या संस्थेवर प्रशासक आहे. इतक्या मोठ्या कालावधीसाठी पहिल्यांदाच प्रशासक नियुक्त करण्यात आला आहे. गत निवडणुकीत राजकीय वैमनस्य असले तरी, प्रशासक नियुक्तीच्या अडीच वर्षाच्या काळात बरेच पाणी पुलाखालून गेले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी, भाजप आणि काँग्रेसच्या मदन पाटील गटाची एकी झाली आहे. राष्ट्रवादीचे माजी मंत्री आ. जयंत पाटील, काँग्रेसचे माजी मंत्री मदन पाटील आणि भाजपचे खासदार संजय पाटील एकत्र आले आहेत. केंद्रात आणि राज्यात भाजप सत्तेवर असल्यामुळे त्यांना सोबत ठेवण्याचे प्रयत्न झाले आहेत. यामुळे काँग्रेसमधील पतंगराव कदम गट बाजूला पडला आहे. जिल्हा बँकेचा हा फॉर्म्युला बाजार समितीतही वापरला जाण्याची शक्यता आहे. पतंगराव कदम आणि वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांची वेगळी आघाडी होण्याची शक्यता असल्याचे माजी संचालकांकडून बोलले जात आहे. या निवडणुकीतही कदम गटाने ताकदीने उतरण्याचा इशारा दिल्याने, ही निवडणूक चुरशीने होण्याची शक्यता आहे. निवडणूक आता तोंडावर आल्याने राजकीय जुळवाजुळवीला वेग आला आहे.