शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील डीबी पथके बरखास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:20 IST

जिल्ह्यातील बारा पोलीस ठाण्यांत १२ डी.बी. पथके आहेत. या सर्व पथकांना पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी अवैध व्यवसाय रोखा, ...

जिल्ह्यातील बारा पोलीस ठाण्यांत १२ डी.बी. पथके आहेत. या सर्व पथकांना पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी अवैध व्यवसाय रोखा, त्यांच्यावर कडक कारवाई करा, गस्त वाढवा, घरफोडी, चेन स्नॅचिंग रोखा, गुन्हे प्रकटीकरणावर भर द्या, अशा सूचना वारंवार केल्या होत्या. त्यात सर्वच डी.बी. पथके अपयशी ठरली. कोरोनानंतर पूर्वपदावर आलेल्या स्थितीनंतर दुचाकी चोरी, घरफोडीचे प्रमाण वाढले. शुक्रवारी वर्षातील पहिली गुन्हे आढावा बैठक पोलीस मुख्यालयात झाली. त्यात पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी या पथकाच्या कामगिरीबाबत नाराजी व्यक्त केली. गेल्या दोन महिन्यांत जुना राजवाडा पोलीस ठाण्यातील पथकाने तीन वाहन चोरीच्या गुन्ह्याची उकल केली. यावर तेथील पथक कायम ठेवण्यात आले, तर अकरा पोलीस ठाण्यांतील पथके बरखास्त करून त्याची पुनर्रचना करण्याच्या सूचना यात केल्या. नवीन पथके नेमण्यासाठी पोलीस उपअधीक्षक व पोलीस निरीक्षकांना नियमावली देण्यात आली आहे. वर्षानुवर्षे स्थानिक गुन्हे अन्वेषण, डीबी पथकात काम करणाऱ्यांना यापुढे या पथकात स्थान देऊ नये, अशी सक्त सूचनाही त्यांनी दिली. नव्या दमाच्या तरुणांना या पथकात संधी द्या. इच्छुकांची यादी तयार करून ती पोलीस उपअधीक्षकांकडे द्यावी. त्यांनंतर उपअधीक्षक त्या इच्छुक कर्मचाऱ्याची परीक्षा घेतील आणि त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याची या पथकात नेमणूक होईल.

चौकट

पथकांमध्ये येण्यासाटी निकष असे,

- डी.बी. पथक किंवा एलसीबीमध्ये दोन वेळा काम केलेल्या कर्मचाऱ्यांना स्थान नाही. उपअधीक्षक इच्छुकांची परीक्षा घेणार. त्यात हद्दीतील सराईत, नोंदीत गुन्हेगारांची माहिती, पद्धत, अवैध व्यवसाय, व्यावसायिकांचे पत्ते, हद्दीतील उपद्रवी घटक, संवेदनशील ठिकाणे, आदींची चाचणी या परीक्षेत होणार आहे. शहर उपअधीक्षकांचा शेरा, सेवा पट, निलंबन, कसुरीवर बदली नसावी.

पाॅईंटर

- सरकारी कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याची त्वरित दखल घेऊन तक्रार दाखल करण्याची सूचना.

- महिला व लहान मुले, यांच्या अपहरण, विनयभंग यासारख्या गुन्ह्यावर वचक बसण्यासाठी ऑपरेशन मुस्कान सलगपणे सुरू ठेवण्याची सूचना.

- गुन्ह्याची संख्या जरी जास्त असली तरी गुन्हा नोंद करण्याचे प्रमाण वाढवा.

- ग्रामपंचायत निवडणुकाच्या अनुषंगाने एक हजारांवर प्रतिबंधक कारवाई केली आहे. तडीपार गुन्हेगारांना केवळ मतदानाच्या दिवशी दोन तासांची मुभा दिली जाणार आहे.

- निर्भया पथकाकडून विनयंभगासारखे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात पेट्रोलिंग, मॅपिंग पॅटर्न बदलून नियमित कारवाई करण्याच्या सूचना