शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दिवसाआड पाणीवाटपाचा आढावा घेणार

By admin | Updated: April 6, 2016 00:33 IST

महापौरांची प्रशासनास सूचना : आज सायंकाळी महापालिकेत बैठक; सावळा गोंधळ उघड

कोल्हापूर : दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असताना उपसा मात्र नेहमीप्रमाणेच होत असल्याचे वृत्त मंगळवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच अधिकाऱ्यांसह महानगरपालिका पदाधिकाऱ्यांचेही डोळे उघडले. त्यावर महापौर अश्विनी रामाणे यांनी तातडीने पाणीवाटपाचा आढावा घेऊन संपूर्ण शहरास सुयोग्य प्रकारे पाणीपुरवठा करण्याची सूचना प्रशासनाला केली. याच विषयावर चर्चा करण्यासाठी आज, बुधवारी सायंकाळी पाच वाजता महानगरपालिकेत प्रमुख पदाधिकारी व पाणीपुरवठा अधिकारी यांची संयुक्त बैठक घेण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले. कोल्हापूर शहरास १ एप्रिलपासून दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे; तरीही नेहमीएवढाच पाणी उपसा आजही होत असल्यामुळे ‘दिवसाआडची मोट जमेना’या शीर्षकाखाली ‘लोकमत’ने वृत्त छापून पाणीपुरवठ्याच्या नियोजनाचा हेतू साध्य होत नसल्याची बाब समोर आणली होती. वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर महानगरपालिकेचे कर्मचारी व पदाधिकारीही चकित झाले. पूर्वीप्रमाणेच पाणी उपसा होत असल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे महापौर रामाणे यांनी मंगळवारी तातडीने आयुक्त पी. शिवशंकर यांना पत्र पाठवून या प्रकाराकडे गांभीर्याने पाहावे आणि नियोजनात काही कमतरता असतील तर तातडीने त्या दुरुस्त कराव्यात, अशी सूचना केली. (प्रतिनिधी) उपनगरात अपुरा पाणीपुरवठा शहराच्या काही भागांत मुबलक पाणीपुरवठा होतो; तर उपनगरांत अपुरा पाणीपुरवठा होत असून पाण्याची कमतरता जाणवते; त्यामुळे पाणीपुरवठ्याचे योग्य प्रकारे नियोजन करावे, अशा सूचना यापूर्वीच देण्यात आल्या होत्या. पाणीगळती काढण्याबाबतही सूचना दिल्या होत्या. तरीही शहरातील गळती काढण्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. पाणीटंचाईच्या कामात प्रशासनाकडून ढिलाई होऊ नये, असेही महापौर रामाणे यांनी म्हटले आहे.नियोजनात त्रुटीएक दिवसाआड पाणीपुरवठ्याच्या नियोजनात त्रुटी असल्यामुळे काही भागांतील नागरिकांना नाहक त्रासाला तोंड द्यावे लागत आहे. आजही उपनगरांत रात्री-अपरात्री आणि अपुरा पाणीपुरवठा होत आहे. रात्री जागून पाणी भरावे लागत आहे. काही भागांत रात्री पाणी सोडले की ते दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत असते. गरज नसतानाही जादा पाणी देण्यात येत आहे. त्याचवेळी दुसऱ्या भागात पाण्यासाठी नागरिकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. एकंदरीत पाणीवाटपाचे नियोजन चुकले असल्याची भावना बळावत आहे.टॅँकरद्वारे पाणीपुरवठाशहरात ज्या भागात पाणी येत नाही, त्या भागातील नागरिकांना पाणी देण्यासाठी टॅँकरचा वापर होत आहे. महापालिकेच्या सहा टॅँकरद्वारे दोन पाळ्यांत पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे टॅँकरचे पाणी घेण्यासाठी नागरिकांना ओढाताण करावी लागत आहे. टॅँकरची प्रतीक्षा आणि तो येताच उडणारी धावपळ आता नागरिकांच्या अंगवळणी पडत आहे.