शहरं
Join us  
Trending Stories
1
आता वेळ नाही, भारतात आल्यावर योग्य उत्तर देईन; शशी थरुर यांचा काँग्रेसला घरचा आहेर
2
पिंपरी-चिंचवड पोलिसांना पाहताच उडाली भंबेरी; नीलेश चव्हाण म्हणाला,'साहेब मला अस्वस्थ वाटतंय...'
3
Onion Price Hike : महाराष्ट्रात कांद्याचे भाव गगनाला भिडणार? नेमकं करण तरी काय?
4
Corona Virus Update : चिंता वाढतेय! २४ तासांत ४ रुग्णांचा मृत्यू, देशभरात सक्रिय रुग्णांची संख्या किती?
5
'बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट', केंद्रीय मंत्री चिराग पासवान विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत
6
सनातन धर्माला काहीही बोललं जातं तेव्हा हा राग कुठे जातो? शर्मिष्ठा पनोलीच्या अटकेवरून पवन कल्याण संतप्त
7
"पाकिस्तानने आधीच सिंधु पाणी कराराचे उल्लंघन केलेय", पाकच्या कांगाव्याला भारताकडून सडेतोड उत्तर!
8
विमान प्रवास होणार स्वस्त? विमान इंधनाच्या किमती सलग तिसऱ्यांदा घटल्या; काय आहेत सध्याचे दर?
9
अजित पवार यांना मोठा झटका, 7 आमदारांनी राम-राम ठोकला; या पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतला
10
नातेवाईक बाहेर करत राहिले विरोध, पोलिसांनी ठाण्यात लावून दिलं लग्न, पोलीसच बनले वऱ्हाडी आणि...  
11
टाटा-रिलायन्सला सरकारी कंपनी ठरली सरस! आठवड्यात कमावला ५९,२३३ कोटी रुपयांचा नफा
12
३० कोटींची लॉटरी जिंकून पैसे गर्लफ्रेंडला दिले, दुसऱ्यासोबत फुर्र होऊन तिने बॉयफ्रेंडलाच कंगाल केले! 
13
भारताची नवीन 'रेड लाईन', पाकिस्तानात 300 KM घुसून हल्ले, CDS चौहान यांची मोठी माहिती
14
ईशान्य भारतात पावसाचा कहर, भूस्खलनासह विविध कारणांनी ३२ जणांचा मृत्यू  
15
पुढील आठवड्यात शेअर बाजारात 'लिस्टिंगचा धमाका'! १० कंपन्या करणार दणक्यात पदार्पण, गुंतवणूकदारांची चांदी?
16
रोज ६,५०० तरुणांची तंबाखूसेवनाला सुरुवात, दरवर्षी १८ लाख जण गमावतात आपला जीव
17
"संविधानामुळेच आपला देश संकटकाळातही एकसंध"; सरन्यायाधीश भूषण गवई यांचे विधान
18
कॉलेजचं प्रेम आयुष्यात परतलं, आधीच विवाहित असलेल्या जवानानं पत्नीला संपवलं
19
चालकाला डुलकी लागली, कार थेट दुभाजक ओलांडून ट्रॅकला जाऊन धडकली; एकाचा मृत्यू, धुळे-सोलापूर महामार्गावरील घटना
20
आनंदाची बातमी...! LPG सिलिंडरची किंमत पुन्हा कमी झाली; 1 जूनपासून ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवा दर

‘दौलत’चा आता होणार बाजारच

By admin | Updated: January 31, 2016 01:23 IST

मंगळवारी निविदा : ‘कुमुदा’ची एक कोटी बयाणा रक्कम जप्त

कोल्हापूर : हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना विक्रीस देण्याबाबत मंगळवारी (दि. २) निविदा प्रसिद्ध करण्याचा निर्णय जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ‘कुमुदा’शी केलेला करार रद्द करीत, त्यांची एक कोटी बयाणा रक्कम जप्त करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. ‘दौलत’ कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यासाठी बॅँकेने ३ डिसेंबरला निविदा प्रसिद्ध केली होती. तिला अकरा जणांनी प्रतिसाद दिला. प्रत्येकी वीस हजार रुपये भरून निविदा फॉर्म खरेदी केले; पण विहित वेळेत केवळ ‘कुमुदा शुगर्स’ने एक कोटी बयाणा रक्कम भरून निविदा सादर केली. जिल्हा बॅँकेने एकूण देय रकमेपैकी दहा कोटी रोख व पंधरा कोटींची बॅँक गॅरंटी द्यावी. त्याचबरोबर १७३ कोटी ६१ लाख सुरक्षित देणी कोणत्या पद्धतीने व कशी देणार याचा तपशील बॅँकेकडे सादर करावा, असे सांगितले होते. ‘कुमुदा’ने कबूल केलेल्या एकाही गोष्टीची पूर्तता केलेली नाही. त्यांना दिलेला कालावधी संपल्याने त्यांच्याशी करार न करण्याचा निर्णय बॅँकेने घेतला आहे. कारखान्याकडे जिल्हा बॅँकेचे ६५ कोटी रुपये येणे आहे. ही रक्कम वसूल झाल्याशिवाय बॅँकेला आर्थिक स्थैर्य मिळणार नाही. तसेच रिझर्व्ह बॅँकेला अपेक्षित असणारा नऊ टक्के सीआरएआर या वसुलीशिवाय करता येणार नाही. या बाबींचा विचार करता ‘दौलत’ कारखान्याबाबत निर्णय घेणे गरजेचे आहे. कारखाना चालविण्यास घेण्यासाठी फारसे कोणी इच्छुक नसल्याने थेट विक्रीची निविदा काढण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. याबाबतची निविदा २ फेबु्रवारीला प्रसिद्ध केली जाणार आहे. जिल्हा बॅँकेचे अस्तित्व टिकविण्यासाठी संचालक मंडळाने कारखान्याबाबत टोकाचा निर्णय घेतला असून, मार्चअखेर कोणत्याही परिस्थितीत वसुली करणे हेच ध्येय राहणार आहे. बयाणा रक्कम म्हणून ‘कुमुदा’कडून घेतलेली एक कोटी रक्कम ‘दौलत’च्या खात्याला जमा करण्यात येणार आहे. उद्या गडहिंग्लजमध्ये सनई-चौघडा जिल्हा बॅँकेने थकबाकीदारांविरोधात वसुली मोहीम जोरात उघडली आहे. कोल्हापूर शहर, शिरोळनंतर आता गडहिंग्लजमध्ये संचालकांनी मोर्चा वळविला असून उद्या, सोमवारी गडहिंग्लजमधील साने गुरुजी सेवकांची पतसंस्थेचे संस्थापक प्रा. किसन कुराडे, हिरण्यकेशी शेतीमाल प्रक्रिया संस्थेचे संस्थापक काळापगोळ यांच्या घरासमोर गांधीगिरी पद्धतीने वसुलीसाठी आंदोलन केले जाणार आहे.