शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
4
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
5
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
6
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
7
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
8
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
9
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
10
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
11
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
12
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
13
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
14
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
15
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
16
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
17
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
18
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
19
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं

‘दौलत’प्रश्नी जिल्हा बँके चा आततायीपणा

By admin | Updated: August 26, 2015 21:42 IST

शेतक ऱ्यांची मागणी : कारखाना भाडेतत्त्वावरच चालवायला द्यावा

नंदकुमार ढेरे- चंदगडहलकर्णी (ता. चंदगड) येथील बहुचर्चित दौलत साखर क ारखान्यावरील जिल्हा बँकेच्या ६३ कोेटी रुपयांच्या क र्जासाठी १९० एक र जमीन, ३५०० मे. टन क्षमतेचा साखर कारखाना, ४५ हजार लिटर क्षमतेची अर्कशाला आणि रोज ६० घनमीटर क्षमतेचा पार्टिकल बोर्ड प्रकल्प, इमारती, आदी सर्वच मालमत्तेची विक्री करणे चुकीचे व अन्यायकारक असल्याची भावना शेतक ऱ्यांतून व्यक्त होत आहे.कारखान्याची रस्त्यालगतची ५० एकर जमीन विकली तरी जिल्हा बँके चे कर्ज फि टू शकेल. बँके चे सर्वच खरे मानायचे ठरले तरी ६३ कोटी रुपयांच्या कर्जासाठी २२० कोटींची (प्रत्यक्षात अंदाजे ५०० कोटी किमतीची) मालमत्ता विकण्याचा अधिकार जिल्हा बँकेला कोणी दिला, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. विकायचेच असेल तर तुमच्या कर्जापुरते विका. गळ्यातील सोन्याची चेन हवी ना? मग नरडे कशासाठी कापता, अशीच काहीशी भावना शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहेत. त्याचबरोबर २२० कोटींचे मूल्यांकन कोणी केले. त्यावेळी ‘दौलत’चे संचालक मंडळ, कामगार, सभासदांचे प्रतिनिधी हजर होते काय? सभासदांना अंधारात ठेवून दौलत लुटण्याचा डाव कोणी आखला आहे? असेही कोडे सभासद शेतकऱ्यांना पडले आहे. कारखाना सभासदांच्या मालकीचाच राहावा आणि त्याबरोबरच बँकही वाचावी यासाठी काही पर्याय उभे करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे समजते. तासगावकर शुगसचा पर्याय स्वीकारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तासगावकर शुगर्सने ३१ मार्च २०१६ पर्यंत टप्प्याटप्प्याने ५० टक्के कर्ज भरण्याचा आणि भाडेतत्त्वावर कारखाना चालविण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यावर बँकेने सकारात्मक विचार करण्यास काहीच हरकत नाही. माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनीही बँकेचे अध्यक्ष आमदार यांनीही दौलत भाडेतत्त्वावर चालविण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, या दोन्ही प्रस्तावांना प्रतिसाद मिळत नसल्याचे समजते. शेतकऱ्यांची दौलत असलेला हा कारखाना भाडेतत्त्वावर चालवायला द्यावा, अशी मागणी शेतकरी, सभासदांतून होत आहे.अतिरेकीपणाची चर्चा एकंदरीत जिल्हा बँक ‘दौलत’चा लिलाव करायचाच यावर ठाम आहे. यामागचे गौडबंगाल काय, ‘दौलत’ची शेंडी हातात सापडली म्हणून बँकेने ती कशीही फि रवावी हे बरे नाही. वसुलीसाठी बँकेचा अतिरेकीपणा चालला असल्याची चर्चा आहे.