शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांच्या हल्ल्यात दाम्पत्य जखमी

By admin | Updated: May 8, 2014 12:45 IST

सावंतवाडीतील घटना : एका रात्रीत चार बंद घरे फोडली

 सावंतवाडी : शहरात चोरीचे सत्र थांबण्याची चिन्हे नसून मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी शहरातील चार बंद घरे फोडली. सालर्ईवाडा येथील पॉल फर्नांडिस यांचे बंद घर फोडताना शेजारी राहणार्‍या भाडेकरुंना त्यांची चाहूल लागताच त्यांनी चोरट्यांचा प्रतिकार केला. परंतु माडाचा पिडा, विटा, काठ्यांचा मारा करीत चोरटे पलायन करण्यात यशस्वी झाले. चोरट्यांच्या हल्ल्यात नगरपालिकेचे कर्मचारी अजीज पापा बेग व त्यांची पत्नी दिलशाद बेग या जखमी झाल्या. त्यांच्या मुलालाही किरकोळ दुखापत झालीे. सावंतवाडी शहरात चोरीचे सत्र सुरूच आहे. मंगळवारी मध्यरात्री शहरातील चार बंद घरे चोरट्यांनी फोडली. यामध्ये वसंत अनंत कानविंदे, दिनेश शंकर गावडे, महेश लक्ष्मण घाडी यांच्या घरांचा समावेश आहे. दिनेश गावडे यांच्या घरातील कपाट फोडून आतील सोन्याची चेन, अंगठी व ७५०० रुपये असा अंदाजे लाखाचा मुद्देमाल लंपास केल्याची माहिती गावडे यांनी दिली आहे. चार बंद घरे फोडल्यानंतर चोरट्यांनी सालईवाडा भागाकडे मोर्चा वळविला. तेथील पॉल फर्नांडिस हे कामानिमित्त वास्को येथे राहत असल्याने त्यांचे घर बंदावस्थेत असते. याचा फायदा घेत चोरट्यांनी घरात घुसून सर्वत्र शोधाशोध सुरू केली. तेथील कपाटे वगैरे फोडत असताना शेजारी भाड्याने राहणारे पालिकेचे कर्मचारी अजीज बेग यांच्या परिवाराला याची कुणकुण लागली. त्यांची पत्नी दिलशाद बेग यांनी बाहेर येऊन पाहिले असता सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी लागलीच याची कल्पना अजीज बेग यांना दिली. एव्हाना आरडाओरडीने सावध झालेल्या चोरट्यांनी पळण्याचा प्रयत्न केला. बेग कुटुंबियांनी त्यांना प्रतिकार केला. परंतु चोरट्यांनी हातात मिळेल त्या वस्तू त्यांच्या दिशेने भिरकावून त्यांना जखमी केले व तेथून पलायन केले. चोरट्यांच्या हल्ल्यात अजीज बेग यांच्या हाताला व मणक्याला, तर दिलशाद बेग यांच्या हात व पायांना दुखापत झाली.