शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक, लक्झरी बसवर दुचाकी आदळली; २० प्रवाशांचा होरपळून मृत्यू, दिवाळी साजरी करून परतत होते
2
ओला-उबरचा बाजार उठणार...! महाराष्ट्रासह 'या' राज्यांत सरकारी 'भारत टॅक्सी' येणार, १०० टक्के भाडे...
3
भूसंपादनाअभावी ‘समृद्धी’ विस्तार निविदा रद्द, ‘शक्तिपीठ’च्या आराखड्यात बदल शक्य: CM फडणवीस
4
कुर्ला, सांगली ते दुबई...मुंबई पोलिसांची धडाकेबाज कारवाई, D-गँगच्या ड्रग्स मास्टरमाइंडला UAE तून खेचून आणले
5
नियतीचा क्रूर खेळ! ६ बहिणींच्या कुटुंबात एकुलता एक मुलगा, भाऊबीजच्या दिवशीच झाला मृत्यू; ऐकून डोळ्यांत पाणी येईल
6
आजचे राशीभविष्य २४ ऑक्टोबर २०२५ : आर्थिक लाभ, खोळंबलेली कामे...
7
भारताची युद्धक्षमता वाढणार, ७९ हजार कोटींची शस्त्रखरेदी; प्रगत नाग क्षेपणास्त्राचा समावेश
8
२२३ एकर भूखंड सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसला; औद्योगिक भविष्यास नवे पंख देणारी गुंतवणूक 
9
पीडीपी, काँग्रेसचा नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा; राज्यसभेच्या ४ जागांसाठी नवे राजकीय समीकरण
10
भाऊबीजनिमित्ताने राज-उद्धव पुन्हा आले एकत्र; आता युतीच्या घोषणेची उत्सुकता
11
इंडिया आघाडीचे ठरले! तेजस्वी यादव बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; सर्व पक्षांचा पाठिंबा
12
बिहार निवडणूक २०२५: मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नितीश कुमारच; ‘एनडीए’ने केले नाव जाहीर
13
अमेरिकेकडून रशियाची कोंडी; दोन ऑइल कंपन्यांवर निर्बंध, युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी नीती
14
भारत रशियाकडून फक्त हे वर्षच तेलखरेदी करणार, मोदींचे मला आश्वासन; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
हिमालयातील पाण्यात १४ वर्षांत ९ टक्के वाढ; केंद्रीय जल आयोगाच्या अहवालातील निष्कर्ष
16
सत्ताधारी पक्षाचे आमदारही फेक नरेटिव्ह सेट करत आहेत का? काँग्रेस नेत्यांचा भाजपला सवाल
17
मुंबई ते नेवार्क एअर इंडिया विमानाचा यू टर्न; ३ तासांनी वैमानिकाला तांत्रिक बिघाडाचा संशय
18
दिवाळी, छठ पूजेस १०.५ लाख प्रवासी यूपी, बिहारला; मुंबईतून आतापर्यंत १४०० पेक्षा जास्त फेऱ्या
19
कबुतरांसाठी जैन मुनींचे उपोषण; १ नोव्हेंबरपासून आझाद मैदानात होणार सुरुवात
20
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री

दत्ता जाधव आता मिरज पोलिसांकडे

By admin | Updated: November 18, 2014 23:31 IST

रेल्वे दरोडा प्रकरण : ‘अपूर्वा’ प्रकरणात आणखी चौघांना अटक

सातारा : खेड येथील ‘अपूर्वा कन्स्ट्रकशन्स’ दरोडाप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या दत्ता जाधव याला मंगळवारी चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली. त्याची रवानगी कारागृहात झाल्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा त्याला मिरज पोलिसांनी रेल्वे दरोड्याच्या प्रकरणात ताब्यात घेतले. या दरोडा प्रकरणाविषयी पोलिसांनी अधिक बोलण्यास नकार दिला.दरम्यान, ‘अपूर्वा कन्स्ट्रकशन्स’ दरोडाप्रकरणी दरोडा प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी सोमवारी रात्री चौघांना अटक केली. अक्षय सुनील जाधव (वय १९, रा. बसप्पा पेठ, सातारा), संतोष शिवाजी सालकर (वय २५, रा. खेड, सातारा), मयूर अरुण गवळी (वय २२, रा. एसटी कॉलनी, शाहूनगर, सातारा), आकाश विठ्ठल राठोड (वय १८, रा. लक्ष्मी टेकडी झोपडपट्टी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत सातारा शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. २६ आॅक्टोबर रोजी रात्री दत्तात्रय रामचंद्र जाधव आणि तीस ते चाळीसजण ‘अपूर्वा कन्स्ट्रकशन्स’मध्ये आले. येथे रखवालदार सागर पाटेकर (वय २९, रा. लिंब गोवे, ता. सातारा) याला दत्ता जाधव आणि त्याच्या सहकाऱ्यांनी ‘तुमचा मालक शिंदेनी पैसे दिले नाहीत. मला भेटला नाही’ अशी विचारणा करतच बाहेरच असणाऱ्या मोटारसायकलची मोडतोड केली आणि भिंत पाडली. यावेळी संतोष लोहार, संतोष निकम यांच्याजवळील मोबाईल आणि रोकड असा तीन हजार रुपयांचा ऐवज नेला होता. याप्रकरणी दत्ता जाधवला अटक करण्यात आली. त्यानंतर सोमवारी रात्री आणखी चौघांना शहर पोलिसांनी अटक केली. याप्रकरणात दत्ता जाधवला पोलीस कोठडी मिळाली. त्याची सुनावणी मंगळवारी झाली. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. त्याची रवानगी कारागृहात झाल्यानंतर त्याला मिरज पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतले आणि मिरजकडे रवाना झाले. दरम्यान, दत्ता जाधवला ताब्यात घेतल्यानंतर मिरज पोलिसांनी अधिक बोलण्यास नकार दिला.(प्रतिनिधी)संदीप जाधवच्या कोठडीत वाढसातारा तालुक्यातील गोवे येथील संतोष निकम, संतोष लोहार, सागर पाटेकर अपहरणप्रकरणात संशयित म्हणून अटक केलेल्या संदीप जाधवला तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती. मात्र, मंगळवारी त्याची पोलीस कोठडी आणखी एका दिवसांने वाढवून ती चार दिवस केल्याची माहिती सातारा तालुका पोलीस ठाण्यातून देण्यात आली.