शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
2
Live in Partner Murder: प्रेयसी रितिकाची गळा दाबून हत्या, दोन दिवस सचिन मृतदेहाजवळ झोपला; मित्रासोबत दारू प्यायला अन्...
3
डोळ्यात मिरची पावडर टाकली मग गळा दाबून केला खून; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केला मोठा कांड
4
Stock Market Today: ७९ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; रियल्टी आणि ऑटो सेक्टरमध्ये तेजी, कारण काय?
5
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
6
रेल्वे तिकीट बुकिंग, पॅन, ITR सह अनेक नियमांमध्ये बदल; एटीएमच्या वापरावरही शुल्क, जाणून घ्या काय काय बदललं
7
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
8
तू काय माझ्याकडे डोळे वटारून बघतो?; राज ठाकरेंनी विचारलं, स्टेजवर बोलावलं, सगळेच हसले!
9
LPG Cylinder Price Cut: स्वस्त झाला LPG सिलिंडर... आजपासून कमी झाली किंमत; दिल्ली ते मुंबईपर्यंतचे हे आहेत नवे दर
10
काँग्रेसचे १५० नेते रशियाचे एजेंट, परदेशातून मिळायची फंडिंग; भाजपा खासदाराचा खळबळजनक दावा
11
'रामायण'च्या पहिल्या भागाचं शूटिंग पूर्ण, रणबीरची ऑनस्क्रीन लक्ष्मणासोबत गळाभेट; Video व्हायरल
12
Vijay Pendse Dies: इस्रोतील माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ विजय पेंडसे यांचे निधन
13
सव्वा लाखाची चप्पल? अहो, ही तर आमची कोल्हापुरी!
14
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
15
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
16
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
17
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
18
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
19
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
20
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे

आचरा येथे दशावतारी महोत्सवास प्रारंभ

By admin | Updated: September 11, 2014 23:11 IST

रामेश्वर मंदिरातील गणेशोत्सव

आचरा : इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या ४२ दिवस चालू असणाऱ्या श्री रामेश्वर गणेशोत्सव समितीने आचऱ्यात ‘लोककला दशावतार’ नाट्य महोत्सव आयोजित केला आहे. हा दशावतार महोत्सव रामेश्वर मंदिर आचरा येथे २२ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.या लोककला दशावतार नाट्यमहोत्सवाचे उद्घाटन रामेश्वर देवस्थानचे माजी विश्वस्त सदाशिव मिराशी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी गणेशोत्सव समिती कार्याध्यक्ष कपिल गुरव सचिव रवींद्र गुरव, विजय कदम, परेश सावंत, विकास गुरव, उदय बापर्डेकर आदी उपस्थित होते. नाट्य महोत्सवाची सुरुवात विठ्ठलादेवी दशावतार नाट्यमंडळ (राठिवडे) सुतारवाडी यांच्या नाट्यप्रयोगाने करण्यात आली. या महोत्सवात जिल्ह्यातील नामांकित दशावतार नाट्यमंडळाने सहभाग घेतला आहे. यात १३ रोजी श्री गणेश दशावतारी नाट्यमंडळ कडावल, १५ रोजी कलेश्वर दशावतारी नाट्यमंडळ नेरूर (बाबी कलिंगण प्रस्तुत), १७ रोजी आजगांवकर दशावतारी नाट्यमंडळ आजगांव (सावंतवाडी), १८ रोजी खानोलकर पारंपरिक मंडळ, १९ रोजी कलेश्वर दशावतारी नाट्यमंडळ नेरूर (सुधीर कलिंगण प्रस्तुत), २० सप्टेंबर रोजी चेंदवणकर दशावतारी नाट्यमंडळ कवठी, २१ रोजी बाळकृष्ण गोरे दशावतारी नाट्यमंडळ कवठी, २२ रोजी पार्सेकर पारंपरिक दशावतारी नाट्यमंडळ वेंगुर्ला या मंडळानी सहभाग घेतला आहे तर २४ सप्टेंबर रोजी रात्री संयुक्त दशावतार होणार आहे. या स्पर्धेकरीता मंगेश टेमकर, बाबू परुळेकर, अभय भोसले, विजय कदम, कपिल गुरव, सचिन हडकर, जेरॉन फर्नांडिस व आचरा गावातील ग्रामस्थांनी काही देणगी स्वरूपात रोख रक्कम समितीकडे जमा केली आहे. दशावतार कलाप्रेमींनी महोत्सवात उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (वार्ताहर)