शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दर्शन शहा खून खटल्याचा दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 22:15 IST

कोल्हापूर : देवकर पाणंद, शुश्रूषानगर येथील दर्शन शहा या शाळकरी मुलाच्या खून खटल्याचा गुरुवारी झालेल्या सुनावणी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला.

ठळक मुद्देनऊ आॅक्टोबरला पुढील सुनावणीशेतात सापडलेल्या दोन्ही वस्तूंमध्ये फरक असल्याने त्यांनी पुराव्यांवर शंका उपस्थितघटनास्थळावरून मिळालेले पुरावेही न्यायालयात सादर केले

कोल्हापूर : देवकर पाणंद, शुश्रूषानगर येथील दर्शन शहा या शाळकरी मुलाच्या खून खटल्याचा गुरुवारी झालेल्या सुनावणी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला. जिल्हा न्यायाधीश एल. डी. बिले यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली. विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी संशयिताच्या वकिलांचे मुद्दे खोडून यावेळी युक्तिवाद केला. याची पुढील सुनावणी ९ आॅक्टोबर २०१७ रोजी होणार आहे. या सुनावणीत खटल्याचा निकाल लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.दर्शन शहा याचा देवकर पाणंद येथे २५ डिसेंबर २०१२ रोजीअपहरण करून खून झाला. या प्रकरणी मुख्य संशयित आरोपी योगेश ऊर्फ चांदणेला जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. दरम्यान, तीन वर्र्षे जिल्हा सत्र न्यायालयात या गुन्'ाचा खटला सुरू आहे. उज्ज्वल निकम यांनी, साक्षीदारांच्या साक्षी न्यायालयात सादर केल्या. याचबरोबर घटनास्थळावरून मिळालेले पुरावेही न्यायालयात सादर केले. संशयिताचे वकील अ‍ॅड. पीटर बारदेस्कर यांनी साक्षीदारांची उलटतपासणी करून बचावाचे मुद्दे मांडले. अखेर गुरुवारी सुनावणीत दोन्ही बाजूंचे युक्तिवाद पूर्ण झाले. यावेळी बारदेस्कर यांनी, घटनास्थळावर मिळालेले संशयितांच्या शर्टचे बटण आणि दोरी यावर आक्षेप नोंदविले होते. बटणाला चिखल लागला होता, तर दोरीला चिखल लागला नव्हता, अशी नोंद पंचनाम्यात आहे. शेतात सापडलेल्या दोन्ही वस्तूंमध्ये फरक असल्याने त्यांनी पुराव्यांवर शंका उपस्थित केली.यावर अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी, शेताचा नकाशा सादर करून बटण आणि दोरी या दोन्ही वस्तू मिळालेली ठिकाणे स्पष्ट सांगून ती स्पष्ट केली. विहिरीजवळ चिखल होता, त्यामुळे बटण चिखलाने माखले, तर कोरड्या मातीत दोरी पडल्याने तिला चिखल लागला नव्हता असे सांगितले. यावेळी संशयित चारू चांदणे यालाही पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर केले होते. यावेळी तपास अधिकारी यशवंत केडगे, दर्शनचे नातेवाईक उपस्थित होते.