शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

तहान भागविण्यासाठी अंधार अपरिहार्य!

By admin | Updated: April 2, 2016 00:19 IST

‘कोयना’ आटू लागले : केवळ ३८.८४ टीएमसीच पाणी शिल्लक; सिंचनासाठी पाणी सोडण्याची सांगली पाटबंधारे विभागाची मागणी

सागर गुजर -- सातारा  -कोयना धरणातील पाणीसाठा अत्यल्प राहिला आहे. कोयनेचे पाणी पिण्यासाठी व सिंचनासाठी सोडावे, अशी मागणी सांगली जिल्ह्यातून होत आहे. या निर्णयाला मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दाखविला तर वीजनिर्मितीसाठी राखीव ठेवलेले २९.१२ टीएमसी पाणी नदीत सोडावे लागणार आहे, त्यामुळे भविष्यातील वीजनिर्मितीवर गंडांतर येण्याची शक्यता आहे. कोयना वीज प्रकल्पातून वर्षाकाठी ३ हजार ३३७ दशलक्ष युनिटस इतकी वीजनिर्मिती केली जाते. वीजनिर्मितीसाठी दरवर्षी ६७.५० टीएमसी इतके पाणी वापरले जाते. कोयनेच्या लाभक्षेत्रातून पिण्यासाठी व शेतीला सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढू लागल्याने शासनपातळीवर नुकतीच एक बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत वीजनिर्मितीसाठी लागणारे पाणी कमी करून ते ५२.५ टीएमसी इतके करावे, असा निर्णय झाला. वीजनिर्मितीसाठी याआधी ३८.३८ टीएमसी पाणी वापर झालेला आहे. ‘महाजनको’ने नेहमीच्या धोरणानुसार २९.१२ टीएमसी पाणी वीजनिर्मितीसाठी राखीव ठेवले होते. मात्र, या पाण्यालाही आता कात्री लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे केवळ १४.१२ टीएमसी इतकेच पाणी वीजनिर्मितीसाठी वापरावे लागणार आहे. अर्थात याबाबतचा शासन आदेश झालेला नसला तरीही सांगलीकरांच्या मागणीनुसार धरणातून कोयना नदीत पाणी सोडणे सुरूच ठेवण्यात आले आहे. धरणाची साठवणक्षमता १०५ टीएमसी आहे. मागील पावसाळ््यात पाऊसच अत्यल्प झाल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरले नव्हते. उन्हाळी पावसानेही चकवा दिल्याने धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होऊ लागला आहे. साहजिकच कोयनेतील वीजनिर्मितीला कात्री बसल्यास राज्याला ऐन उन्हाळ्यात भारनियमनाला सामोरे जाण्याची शक्यता वाढलेली आहे. धरणातील पाणी प्राधान्यक्रमाने पिण्यासाठी सोडले जात असते. उन्हाळा तीव्र असल्याने पिण्याच्या पाण्याची मागणी वाढलेली आहे. धरणातील पाणी पिण्यासाठी सोडावे, अशी सांगली पाटबंधारे विभागाची मागणी आहे. जानेवारी महिन्यात मुंबईत झालेल्या बैठकीत वीजनिर्मितीवर ६७.०५ टीएमसी पाणी वापराऐवजी ५२.५ टीएमसी पाणी वापरावे, असा निर्णय झाला होता. मात्र, त्याबाबतचे लेखी आदेश काढले गेलेले नाहीत.- वैशाली नारकर,अधीक्षक अभियंता, कोयना धरण विभाग