शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पाणीदार कोल्हापूरला टंचाईच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 00:39 IST

विविध ठिकाणच्या वार्ताहरांकडून : पाणीदार जिल्हा म्हणून राज्यात ओळख असलेल्या कोल्हापूरचा पाराही कधी नव्हे ते एप्रिल महिन्यातच ४० अंश ...

विविध ठिकाणच्या वार्ताहरांकडून :पाणीदार जिल्हा म्हणून राज्यात ओळख असलेल्या कोल्हापूरचा पाराही कधी नव्हे ते एप्रिल महिन्यातच ४० अंश डिग्री सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. या कडक उन्हाळ्यामुळे जिल्ह्यातील धरणसाठा तसेच भूजल पातळी झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात अनेक गावात पाणीटंचाई जाणवत आहे. तापमानातील वाढ अशीच राहिल्यास मे अखेरीस जिल्ह्यातील शेकडो गावात टंचाईच्या झळा जाणवणार हे नक्की आहे. हे लक्षात घेऊन प्रशासनानेही आतापासूनच नियोजन करण्यास सरसावले आहे.जिल्ह्यातील १२ तालुक्यापैकी आजरा, गडहिंग्लज, चंदगड, गगनबावडा, राधानगरी, शाहूवाडी हे अतिवृष्टीचे तालुके आहेत. गतवर्षी पाऊस चांगला झाल्याने जवळपास सर्व धरणे शंभर टक्के भरली होती. मात्र, सध्या या तालुक्यातील धरणात ५० टक्क्यांहून कमी पाणीसाठा आहे.राधानगरी तालुक्यातील पन्नासहून अधिक वाड्या-वस्त्यांवर, चंदगडच्या आठ गावांत, आजरा तालुक्यातील २१ गावांतील वाड्या-वस्तीवर, गडहिंग्लजमधील ८९ पैकी २२ गावांत, शाहूवाडीतील १५ ते २0 धनगरवाडे, पाच ते दहा गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तर करवीर तालुक्यातील ११८ गावांपैकी सहा गावांत व पाच वाड्यांमध्ये, हातकणंगलेतील ६२ पैकी १३ गावांमध्ये, भुदरगडमधील आठ गावे आणि चोवीस वाड्या-वस्त्यांना, पन्हाळा तालुक्यातील अनेक गावात, शिरोळच्या तमदलगे या गावाला टंचाई जाणवत आहे. कागल व गगनबावड्यात काही गावे टंचाईच्या काठावर असली तरी अद्याप टंचाईग्रस्त म्हणून पुढे आलेली नाहीत.ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन निवडणुकीच्या धकाधकीतून बाहेर पडलेल्या जिल्हा प्रशासनाने आणि जिल्हा परिषदेने पाणीटंचाईकडे लक्ष दिले असून, जिल्हाधिकाऱ्यांनी एकूण २६ ठिकाणी नव्या कूपनलिका मंजूर केल्या आहेत. येत्या आठवड्याभरात अन्य प्रस्तावांना मंजुरी देण्यात येणार आहे; परंतु दरवर्षी पाणीटंचाईवर उपाय म्हणून तात्पुरती मलमपट्टी करण्यापेक्षा कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक आहे.आॅक्टोबर महिन्यामध्ये पाणीपातळी विचारात घेऊन शासनाचा भूजल सर्वेक्षण विभाग संभाव्य पाणीटंचाईची ठिकाणे ठरवून तसा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना देत असतो. अशातच प्रांताधिकाºयांच्या अहवालाशिवाय एखाद्या गावामध्ये पाणीटंचाईची परिस्थिती घोषित केली जात नाही. त्याचे निकष ठरलेले आहेत, तर नव्या कूपनलिकांना परवानगी देण्याचे अधिकार जिल्हाधिकाºयांना आहेत.कोल्हापूर जिल्हा परिषदेने एकूण २९७ ठिकाणी पाणीटंचाईच्या उपाययोजना अवलंबण्याचा प्रस्ताव तयार केला होता. या सर्व उपाययोजनांचे सर्वेक्षण झाल्यानंतर १५१ ठिकाणच्या उपाययोजना अयोग्य असल्याचा निष्कर्ष समोर आला. उर्वरित १४६ पैकी ६३ ठिकाणी नव्या कूपनलिका घेण्याचा प्रस्ताव असून त्यापैकी ३६ प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकाºयांना सादर करण्यात आले. त्यापैकी २६ प्रस्तावांना शुक्रवारअखेर मंजुरी देण्यात आली असून, नव्या कूपनलिकांच्या खुदाईलाही सुरुवात झाली आहे.प्रस्तावित उपाययोजनासार्वजनिक विहिरी खोल करणे, गाळ काढणे, खासगी विहिरी अधिग्रहित करणे, नवीन कूपनलिका, नळपाणी पुरवठा योजनांची विशेष दुरुस्ती, तात्पुरत्या किंवा पूरक नळ पाणी पुरवठा योजना राबविणे, कूपनलिकांची दुरुस्ती अशा माध्यमातून टंचाईवर उपाययोजना करण्यात येते.तालुका खासगी विहिरी अधिग्रहण नवीन कूपनलिकागाव वाड्या गाव वाड्याआजरा २ 0 ५ १४भुदरगड २ ४ ४ १६चंदगड ५ ५ ७ ७गडहिंग्लज १२ २ ६ ७गगनबावडा 0 0 १ ४हातकणंगले १७ १ २ ९करवीर ३ 0 ३ ३कागल 0 0 0 २५पन्हाळा ९ ४ ३ ८राधानगरी 0 0 २ ४२शाहूवाडी ३ 0 २ ८शिरोळ ६ 0 ६ २0एकूण ५९ १६ ४१ १६३दरवर्षी तेच तेदरवर्षी याच अनेक गावांमध्ये टंचाई जाणवते. यामध्ये छोट्या छोट्या वाड्या-वस्त्यांची संख्या अधिक आहे. जिल्ह्यातील ४१ गावांमध्ये टंचाई आहे, तर १६३ वाड्यांवर पाणीटंचाई आहे.त्यामुळे दरवर्षी तेच ते प्रस्ताव तयार करून, त्याची मंजुरी घेऊन कूपनलिका खोदण्यापेक्षा तेथे अन्य पर्याय कायमस्वरूपी देता येतात का? याचा विचार होण्याची गरज आहे.