शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

धोकादायक वळणे ठरताहेत साक्षात मृत्यूचा सापळा

By admin | Updated: April 23, 2015 00:57 IST

कोल्हापूर-रत्नागिरी मार्ग : अरुंद वळणांचे रुंदीकरण, तसेच धोकादायक पुलांचे बांधकाम करण्याची वाहनधारकांची मागणी

आंबा : तालुका ठिकाणापासून केवळ तीन किलोमीटर अंतरावर कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील बहिरेवाडी पूल साक्षात मृत्यूचा सापळा बनला आहे. गेल्या आठवड्यात या अरुंद पुलावरून कोसळणारी सँट्रो सुदैवाने वाचली. कोकण व घाट प्रदेशाला जोडणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गावरील अरुंद वळणांचे रुंदीकरण व धोकादायक पुलांचे बांधकाम न झाल्याने आंबा विश्रामधामपुढील हसुकीचे वळण, तळवडे डी. पी.जवळील वळण, वालूरफाटा, निळे, बहिरेवाडी, केर्ली, वाघबीळ येथील वळणे अपघाताची केंद्रे बनली आहेत. शाहूवाडीतील बहिरेवाडीचा पूल नेमका अरुंद वळणावर व दोन्ही बाजूने दरीच्या भागावर असल्याने येथे अपघात ठरलेले आहेतच. वरचेवर होणाऱ्या अपघातांमुळे पुलाचे गार्ड तुटून त्याची टोके रस्त्याच्या दिशेने वळली आहेत. सुमारे ५० फुटांच्या वक्राकार पुलावरून वाहन जाताना समोरील वाहन थांबवावे लागते. उतारावरून येणाऱ्या वाहनाला पुढचे वाहन क्रॉस होत असेल, तर बाजूपट्टी नसल्याने वाहन थेट पुलाच्या गार्डवरून थेट ५० फूट खोल कडेलोट होणे, हाच पर्याय राहतो. प्रशासनाने या वळणावरील पुलाचे रुंदीकरण करून दरीच्या भागावर सिमेंटचे संरक्षक कठडे उभारावेत, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे. गेल्या पाच वर्षांपूर्वी येथून एक किलोमीटरवरील करंजोशी गावाजवळील पुलावरून एस.टी. कोसळून नऊ प्रवासी ठार, तर वीसजण जखमी झाले होते. त्या पुलापेक्षा हा बहिरेवाडीचा पूल अधिक धोकादायक असताना संबंधित अधिकारी या पुलाची दुरवस्था नजरेआड करीत आहेत. प्रशासन मोठा अपघात होण्याची वाट पाहते का? असा संतप्त सवाल वाहनधारकांतून व्यक्त होत आहे. कोल्हापूर-रत्नागिरी या १४० किलोमीटर दरम्यान मलकापूर येथील शाळी नदीवरील पूल, भोसलेवाडी व तळवडे येथील पूल, धोपेश्वर फाट्यानजीकचा पूल, वारूळ येथील कडवी नदीवरील पुलांची उभारणी शंभर वर्षांपूर्वीची आहे.बॉक्साईट खनिज, ऊस, कोकणातून येणारे लाकूड या वाहतुकीबरोबर, पवनचक्की, कोकण रेल्वे, जैतापूर प्रकल्प, दाभोळ व फिनोलेक्स प्रकल्पांची अवजड मशिनरी, शिवाय घाटावरून बाजारपेठांना जाणारा माल, भाविक-पर्यटकांचे वाढते प्रमाण पाहता या मार्गावरचे दळणवळण वाढले आहे.सह्याद्रीचा घाटमाथा व अतिवृष्टीच्या टप्प्यातून हा रस्ता जात असल्याने या रस्त्याच्या चौपदरीकरणाला गती देणे गरजेचे आहे. सव्वाशे वर्षे होऊन गेलेल्या पुलांच्या पुनर्बांधणीचे प्रस्ताव निधीअभावी धूळ खात पडले आहेत. लोकप्रतिनिधींनी या रस्त्याच्या मजबुतीसाठी निधी मिळवण्यास पाठपुरावा करावा, अशी शाहूवाडी-पन्हाळावासीयांची मागणी आहे.