शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

उंदरवाडीतील साकव धोकादायक

By admin | Updated: November 24, 2014 23:58 IST

बोरवडेतही हीच अवस्था : पाटबंधारे खात्याचे दुर्लक्ष; शेतकऱ्यांचा साकवावरून धोकदायक प्रवास

रमेश वारके - बोरवडे -कागल तालुक्यातील बोरवडे व उंदरवाडी येथील गावांच्या कॅनॉलवर असणाऱ्या साकवांची दुरवस्था झाली आहे. पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे या साकवावरील वाहतूक मृत्यूचा सापळा बनली आहे. अनेक अपघात होऊनही पाटबंधारे खात्याचे दुर्लक्ष होत आहे.कॅनॉल दुथडी वाहू लागल्यानंतर मोठी दुर्घटना होण्याची भीती ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे. एखादी मोठी घटना घडल्यानंतरच संबंधित खाते जागे होणार का? असा संतप्त सवाल बोरवडे-उंदरवाडी येथील शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.बोरवडे येथील पठार नावाच्या साठेमाळवाडी बाजूस असणाऱ्या कॅनॉलवर २२ वर्षांपूर्वी साकव उभा करण्यात आला आहे. निपाणी-राधानगरी रस्त्यावरून पठाराकडे पाणंद गेली आहे. संबंधित साकव हा पाणंदीच्या समोर उभा करणे गरजेचे होते; परंतु पाटबंधारे खात्याने या पाणंदीच्या उजव्या बाजूस पन्नास मीटर अंतरावर हा साकव उभा करणे गरजेचे होते; परंतु पाटबंधारे खात्याने या पाणंदीच्या उजव्या बाजूस पन्नास मीटर अंतरावर हा साकव उभा केला आहे. या साकवावरून शेतकरी व जनावरांची नेहमी वर्दळ असते. अशातच साखर कारखाने सुरू झाल्याने ऊस तोडणीसाठी या दोन्ही साकवावरून शेतकरी वर्गाची धावपळ सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीस हे दोन्ही साकव अडचणीचे होत आहेत.साकवाच्या दोन्ही बाजूच्या आधारासाठी असणारे संरक्षक कठडे (सळ्या) चोरीला गेले असून, वाहतुकीदरम्यान हा साकव हलतो. तसेच साकवावर वाहतुकीसाठी खाली टाकण्यात आलेला पत्रा गंजून तो कमकुवत झाल्याने सडत चालला आहे. त्यामुळे जनावरांचे पाय अडकून अपघात झाले आहेत.उंदरवाडी येथील साकवाचीही मोठी दुरवस्था झाली आहे. या साकवावर अनेक अपघात घडले आहेत. दुचाकींसह-चालक पडणे, फाटलेल्या पत्र्यात पाय अडकून जखमा होणे, अशा घटना वारंवार घडल्या आहेत. भीतीपोटी स्त्रिया व लहान मुलांनी साकवावरून प्रवास करणे बंद केले आहे. बोरवडे व उंदरवाडी येथील साकव दुरुस्त करून ग्रामस्थांना सुरक्षितपणा यावा यासाठी शिवसेनेच्यावतीने आंदोलन केले होते. संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून संबंधित साकवासंदर्भात आश्वासन दिले होते. संबंधित खात्याने याकडे लक्ष दिले नाही, तर आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.