शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

डोंगराला भेग पडल्याने कांडवणच्या धरणाला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:25 IST

आंबा : शाहूवाडीच्या उत्तर सीमेवर सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या कांडवण धरणाच्या उजव्या बाजूला असलेल्या डोंगराला आडवी भेग गेल्याने ...

आंबा : शाहूवाडीच्या उत्तर सीमेवर सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या कांडवण धरणाच्या उजव्या बाजूला असलेल्या डोंगराला आडवी भेग गेल्याने धरणाला धोका निर्माण झाला आहे. या डोंगरापासून धरणाच्या पायथ्याकडे एक किलोमीटरवर वसलेल्या आगलावेवाडी व पुढे एक किलोमीटर अशी दोन किलोमीटर डोंगराला आडवी भेग पडली आहे.

कांडवण धरणाच्या पायथ्याशी व भेग पडलेल्या डोंगरावर असलेल्या चाळीस घरांच्या आगलावेवाडीला यामुळे भूस्खलनाचा धोका आहे. येथील २०५ ग्रामस्थ २३ जुलैपासून भीतीमुळे कांडवण गावात मुक्कामी आहेत. या वाडीला बुधवारी तहसीलदार गुरू बिराजदार यांनी भेट देऊन वस्ती हलविण्याचे आदेश दिले आहेत. भूगर्भतज्ज्ञांना बोलावून डोंगरांची भेग दाखवली जाईल व त्यानंतर निर्णय घेतला ‌जाईल, असे बिराजदार यांनी सांगितल्याचे सुभाष आगलावे यांनी सांगितले. धरणातील सांडव्यातून येणारे पाणी छोट्या पुलाखालून जात असून, हा पूल ओलांडून डोंगरावरील आगलावेवाडीतील ग्रामस्थ जीव मुठीत घेऊन ये-जा करत आहेत. सात दिवसांपासून वीज नसल्याने व मोबाईलला नेटवर्क नसल्यामुळे कोणाशीही संपर्क झालेला नाही. डोंगरावरच्या वस्तीवर दहा फुटावरच भेग गेल्याचे सभापती विजय खोत व उपसरपंच शिवाजी चांदे यांनी सांगितले. पावसात तात्पुरते स्थलांतर करण्याबरोबरच येथून अन्यत्र पुनर्वसन करावे, अशी मागणी उपसरपंच चांदे यांनी माजी आमदार सत्यजित पाटील यांच्याकडे केली. माजी आमदार सत्यजित पाटील व सभापती विजय खोत यांनी कानसा खोऱ्याची पाहणी केली व मुख्यमंत्र्यांकडे भूस्खलनामुळे झालेल्या नुकसानभरपाईसाठी विशेष निधी देण्याची लेखी मागणी केली आहे.

२९ कांडवण धरण भेग

फोटो ओळी : कांडवण धरणाखालील आगलावेवाडीच्या डोंगरावर भेग पडली आहे.