शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

देशाला हुकूमशाहीचा धोका : श्रीपतराव शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:19 IST

गडहिंग्लज : सर्वसामान्य जनता, कामगार आणि शेतकऱ्यांचा विरोध डावलून कायदे करण्याचा सपाटा केंद्रातील भाजप सरकारने सुरू ठेवला आहे. भांडवलदारांच्या ...

गडहिंग्लज : सर्वसामान्य जनता, कामगार आणि शेतकऱ्यांचा विरोध डावलून कायदे करण्याचा सपाटा केंद्रातील भाजप सरकारने सुरू ठेवला आहे. भांडवलदारांच्या हितासाठीच ही दडपशाही सुरू आहे. त्यामुळे देशाला हुकूमशाहीचा धोका आहे, असे मत जनता दलाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माजी आमदार अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांनी व्यक्त केले.

शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्या, मंगळवारी ‘भारत बंद’ची हाक देण्यात आली आहे. त्याला पाठिंबा देण्याचा निर्णय येथील सर्वपक्षीय बैठकीत झाला. अध्यक्षस्थानी अ‍ॅड. शिंदे होते. येथील नगरपालिकेच्या सभागृहात ही बैठक झाली.

शिंदे म्हणाले, अंबानी आणि अदानी यांच्या हिताचीच सरकारला काळजी आहे. कार्पोरेट कंपन्यांच्यामार्फत शेतीमाल खरेदी करण्याचे सरकारचे धोरण आहे. कांहीकाळ त्या कंपन्या शेतीमालाला चांगला भाव देतील. परंतु, त्यानंतर शेतकऱ्यांच्या पिळवणुकीला मर्यादा राहणार नाही.

यावेळी उपनगराध्यक्ष महेश कोरी, ‘भाकप’चे कॉ. दशरथ दळवी, काँग्रेसचे शहराध्यक्ष बसवराज आजरी, युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गुंड्या पाटील, दलित महासंघाचे प्रकाश कांबळे यांचीही भाषणे झाली.

बैठकीस जनता दलाचे कार्याध्यक्ष उदय कदम, शहराध्यक्ष काशिनाथ देवगोंडा, गडहिंग्लज व्यापारी पतसंस्थेचे अध्यक्ष राजशेखर यरटे, तम्माण्णा पाटील, नगरसेविका सुनीता पाटील, क्रांतिदेवी शिवणे, आदी उपस्थित होते.

जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक यांनी प्रास्ताविक केले. सागर पाटील यांनी आभार मानले.

------------------------

* आज व्यापाºयांची बैठक

शेतकऱ्यांच्या आंदोलनाची भूमिका पटवून देऊन बंदला व्यापाऱ्यांचा पाठिंबा मिळविण्यासाठी गडहिंग्लज चेंबर ऑफ कॉमर्स व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची बैठक आज, सोमवारी दुपारी एक वाजता आयोजित पालिका सभागृहात बोलविण्यात आली आहे.

------------------------

फोटो ओळी : गडहिंग्लज येथील सर्वपक्षीय बैठकीत अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बाळेश नाईक, गुंड्या पाटील, काशिनाथ देवगोंडा, बसवराज आजरी, महेश कोरी, दशरथ दळवी उपस्थित होते.

क्रमांक : ०६१२२०२०-गड-१०