कोल्हापूर : रेल्वे फाटक परिसरात शनिवारी दुपारी झाडाची मोठी फांदी तुटून पडल्याने त्याखाली सापडून चार दुचाकींचे मोठे नुकसान झाले. ही वाहने या झाडाखाली पार्क केली होती. येथे रोज लोकांची मोठी वर्दळ असते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.
शहरात अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडणे किंवा फांद्या तुटण्याच्या घटना घडतात. शनिवारी दुपारी रेल्वे फाटक परिसरातील जुन्या झाडाची फांदी तुटून पडली. त्या फांदीखाली अनेक दुचाकी उभ्या असतात, तसेच विनायक शेअर ए रिक्षा संघटनेचा येथे थांबा आहे. परिसरात अनेक लोकांची वर्दळ असते. सुदैवाने झाडाची फांदी जेथे तुटून पडली तेथे कोणीही नव्हते. त्यामुळे जीवित हानी टळली. मात्र, उभ्या केलेल्या दुचाकीवर ही फांदी पडल्याने चार दुचाकींचे हजारो रुपयांचे नुकसान झाले.
फोटो नं. १३०२२०२१-कोल-ट्री ॲक्सिडेंट०१,०२
ओळ : रेल्वे फाटक परिसरात शनिवारी दुपारी झाडाची मोठी फांदी तुटून पडल्याने त्याखाली सापडून दुचाकींचे मोठे नुकसान झाले.