सरूड :
दुग्ध व्यवसाय हा शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय बनला असल्यामुळे दूध संस्थांनी पारदर्शक कारभाराद्वारे दूध उत्पादक सभासदांचे हित जोपासावे, असे प्रतिपादन उदय साखर कारखान्याचे संचालक युवा नेते रणवीरसिंग गायकवाड यांनी केले .
सरुड ( ता . शाहूवाडी ) येथे श्री व्यंकटेश सह. दूधसंस्था या गोकुळ दूध संघाशी संलग्न असलेल्या नूतन संस्थेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी संस्थेला दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांचा रणवीरसिंग गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास पंडितराव थोरात, सर्जेराव थोरात , रघुनाथ रोडे पाटील , बाजीराव पाटील , अमर थोरात , पै. सादिक यादव , देवेंद्र पाटील , भाऊसिंग पाटील , राजाभाऊ थोरात , दादा थोरात , सदाशिव लाड , तानाजी पाटील , गामाजी थोरात , उदय थोरात ,गोकुळचे पर्यवेक्षक दिलीप गवळी आदींसह संस्थेचे दूध उत्पादक उपस्थित होते .
१९ सरूड रणवीरसिंग गायकवाड
फोटो ओळी :
सरुड येथे व्यंकटेश सह. दूध संस्थेच्या उद्घाटनप्रसंगी युवा नेते रणवीरसिंह गायकवाड सोबत पंडितराव थोरात , रघुनाथ रोडे पाटील , बाजीराव पाटील , सर्जेराव थोरात , राजाभाऊ थोरात आदी मान्यवर .