शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

शववाहिका चालकांचा रोजचा प्रवास मृत्यूसोबत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:22 IST

कोल्हापूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाची जोखीम पत्करून काेरोनाग्रस्त मृतदेहांची रुग्णालय ते स्मशानघाटापर्यंतची ने-आण करण्याची सेवा महापालिकेच्या अग्निशमन दलातील १८ ...

कोल्हापूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाची जोखीम पत्करून काेरोनाग्रस्त मृतदेहांची रुग्णालय ते स्मशानघाटापर्यंतची ने-आण करण्याची सेवा महापालिकेच्या अग्निशमन दलातील १८ चालक अहोरात्र करीत आहेत. अनेकदा कोरोनाने मृत झालेल्या नागरिकांचे प्लास्टिक रॅपिंग व रुग्णालयीन प्रक्रिया होण्याअगोदरच नातेवाईक शववाहिकेसाठी आग्रह करतात. अशावेळी दोन-दोन तास चालकाला पीपीई कीट घालून उन्हाच्या तडाख्यातही तिष्ठत उभे राहावे लागते. यात चालकाला अनेकदा उष्णतेचा त्रास होतो; पण तरीही कुरकुर न करता ही सेवा चालक देत आहेत.

महापालिकेने शहराअंतर्गत एखाद्या नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर त्या मृत व्यक्तीच्या घर ते स्मशानघाटापर्यंत मोफत नेण्याची सोय आहे. या सेवेअंतर्गत रोज किमान वीसजणांचे मृतदेह पंचगंगा, बापट कॅम्प, कसबा बावडा येथील स्मशानघाटापर्यंत नेले जातात. त्याकरिता लक्ष्मीपुरी, ताराराणी चौक, महापालिका, शास्त्रीनगर, फुलेवाडी, टिंबर मार्केट, कसबा बावडा येथील फायर स्टेशनमध्ये प्रत्येकी एक किंवा दोन या पद्धतीने सात शववाहिका आहेत. या शववाहिकेवर नियमित चालक आहेत. तरीसुद्धा कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता अग्निशमन दलातर्फे फायर फायटरवरीलही चालकांना प्रत्येकी चार दिवसांनी एक दिवस अशा प्रमाणे कोरोना मृतदेह घर ते स्मशानघाटापर्यंत नेण्याची ड्युटी दिली आहे. रोज किमान नऊ कोरोना मृतदेह वाहून नेले जातात. मृतदेह पोहोचवून चालक स्टेशनला आल्यानंतर त्या चालकाला सॅनिटायझेशननंतर शरीरात पाण्याच्या कमतरतेमु‌ळे डिहायड्रेशन व अन्य त्रासाला सामोरे जावे लागते. अशावेळी अन्य कर्मचारी ग्लुकोज व ओआरएस देऊन पुन्हा चालकांना ताजेतवाने करतात. अनेकदा चालकांना कोरोना मृतदेह वाहून नेल्यानंतर मानसिक ताण येतो. त्यामुळे अग्निशमन दलाने नियमित शववाहिका चालकांसह दलातील फायर फायटरवरील चालकांनाही चार दिवसांतून एकदा ही ड्युटी बंधनकारक केली आहे. त्यामुळे काही अंशी चालकांना दिलासा मिळाला आहे.

चौकट

एकूण शववाहिका - ७

त्यापैकी कार्यरत - ५

कोविडसाठी - २

नाॅन कोविडसाठी - ३

राखीव शववाहिका - २

चालक संख्या - १८

सरासरी रोज १७ मृतदेहांची ने-आण

कोविड - ९

नाॅनकोविड - ८

चालकांना या समस्या

शववाहिकेवर काम करणाऱ्या चालकांना पीपीई कीट घालून कोरोनासह नियमित शववहन करावे लागते. त्यामुळे डिहायड्रेशन, मळमळणे, अशक्तपणा येणे अशा समस्येला सामोरे जावे लागत आहे.

कोट

कोरोना मृतदेह स्मशानघाटापर्यंत नेण्यासाठी रुग्णालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच शववाहिकेसाठी नागरिकांनी फोन करावा. जेणेकरून चालकांनाही रुग्णालयाच्या दारात ताटकळत राहावे लागणार नाही. त्यानंतर पुढील वर्दीकरिता तत्काळ जाणे सोईचे होईल. योग्य ती कोरोनासंबंधी सुरक्षा नियम पाळून ही सेवा २४ तास अग्निशमन दल पुरवीत आहे.

रणजित चिले,

मुख्य अग्निशमन अधिकारी, कोल्हापूर