शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर शिवसैनिक तुम्हाला पळवून लावतील"; शिंदेसेनेचा भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना इशारा
2
गोंदियात EVM चं सील तोडल्याचा आरोप तर सांगलीत रातोरात मतदान वाढल्याचा दावा; स्टाँगरूमबाहेर राडा
3
पुणे पोलिसांनी अटक केलेली शीतल तेजवानी कोण? पार्थ पवारांच्या कंपनीसोबत केला होता जमिनीचा व्यवहार
4
इंडिगोची 'साडेसाती' संपता संपेना... आजच्या दिवशी तब्बल २०० विमान उड्डाणे रद्द, गोंधळ सुरूच
5
Sunny Leone : 'बेबी डॉल' झळकली शेतात; सनी लिओनीचे फोटो शेतकऱ्यांनी चक्क बांधावर लावले, कारण...
6
पुतिन यांच्या भेटीपूर्वी युरोपने भारताला युद्ध संपवण्याचे आवाहन केले; म्हणाले, ते तुमचे ऐकतात...'
7
कोण आहे 'ती' इराणी मुलगी; जिच्यावर अमेरिकेनं लावलंय हाफिज सईद इतकं इनाम!
8
'Bata' हा भारतीय फुटवेअर ब्रँड आहे का? अनेक जण करतात ही चूक; पाहा कोणते ब्रँड्स आहेत स्वदेशी आणि कोणते विदेशी?
9
नागपूर हिवाळी अधिवेशन सात दिवसांचेच शनिवार, रविवारी कामकाज; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे सावट
10
रशियात भारतीय १०० रुपयांचे मूल्य किती! व्यापारावर याचा थेट कसा परिणाम होतो?
11
मुंबईत दुबार मतदारांचा गोंधळात गोंधळ सुरुच; पहिल्याच प्रयोगात नावाशी साधर्म्य असणारेच सर्वाधिक मतदार
12
केकेआरला पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, त्यानेच मैदान गाजवलं; २१५ च्या स्ट्राइकनं केल्या धावा
13
स्मार्टफोनमध्ये संचार साथी ॲप अनिवार्य नाही; सर्व बाजूंनी टीका झाल्यानंतर सरकारची माघार
14
"मी इतकंच सांगेन की...", विजय देवरकोंडासोबत लग्नाच्या चर्चांवर रश्मिका मंदानाने सोडलं मौन
15
Video: बिहारमध्ये लग्नाच्या पंगतीत रसगुल्ले कमी पडल्यानं तुंबळ हाणामारी; वऱ्हाडी भिडले अन्...
16
मुलींसाठी LIC ची जबरदस्त स्कीम, ₹१२१ रुपयांच्या बचतीतून मिळेल लाखोंचा रिटर्न; कोणती आहे योजना?
17
पतीची हत्या करून ड्रममध्ये टाकणाऱ्या मुस्कानची नवी मागणी; म्हणे, मुलीचा चेहरा प्रियकराला दाखवायचाय!
18
शेअर बाजारात आधी घसरण मग सावरला; सेन्सेक्समध्ये ३५ अंकांची तेजी, निफ्टी २५,९९५ च्या पुढे
19
कर्जासाठी कायपण! पाकिस्तानला विकावी लागणार सरकारी विमान कंपनी; 'फिल्ड मार्शल' मुनीर यांचा डोळा
20
"डोळे मिट, मनात इच्छा धर, फुंकर मार"... रोहित शर्मा- ऋषभ पंत यांचा भर मैदानात वेगळाच 'खेळ'; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

'एक पहाट पन्हाळगडावर, ‘कोल्हापूर हायकर्स’चा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 19:13 IST

अपरिचित गडकिल्ल्यांवर ट्रेकिंगचे आयोजन करणाºया ‘कोल्हापूर हायकर्स’ या ग्रुपच्या वतीने मंगळवारी (दि. १७) पहाटे ‘एक पहाट पन्हाळगडावर’ या उपक्रमांतर्गत दीपोत्सव साजरा करण्यात आला. या उपक्रमाचे हे पाचवे वर्ष होते. या दीपोत्सवाने संपूर्ण गडपरिसर उजळून निघाला होता.

ठळक मुद्दे ‘कोल्हापूर हायकर्स’ ग्रुपच्या वतीने ‘एक पहाट पन्हाळगडावर’ पन्हाळगडावर दीपोत्सवाची सुरुवात शिवमंदिरापासून

पन्हाळा  , दि. १८ :  अपरिचित गडकिल्ल्यांवर ट्रेकिंगचे आयोजन करणाºया ‘कोल्हापूर हायकर्स’ या ग्रुपच्या वतीने मंगळवारी (दि. १७) पहाटे ‘एक पहाट पन्हाळगडावर’ या उपक्रमांतर्गत दीपोत्सव साजरा करण्यात आला. या उपक्रमाचे हे पाचवे वर्ष होते. या दीपोत्सवाने संपूर्ण गडपरिसर उजळून निघाला होता.

बदलत्या काळात आजच्या तरुणाईला इतिहासाचे भान व्हावे आणि किल्ल्यांचे महत्त्व प्रत्येक तरुणापर्यंत पोहोचावे यासाठी हा ग्रुप नेहमी प्रयत्नशील असतो. प्रत्येक वर्षी वेगवेगळे उपक्रम साजरे करण्यात ‘कोल्हापूर हायकर्स’चे सदस्य पुढे असतात.

ज्या शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करून संपूर्ण महाराष्ट्र उजळून टाकला, त्याच महाराजांनी घडविलेले अनेक किल्ले दीपावलीच्या काळात अंधारातच असतात, ही बाब लक्षात घेऊन या वर्षी मंगळवारी धनत्रयोदशीदिवशी पहाटे पन्हाळगडावर दीपोत्सव आयोजित करण्यात आला होता. प्रतिवर्षी या दीपोत्सवाचे स्वरूप व्यापक होत आहे.

दीपोत्सवाची सुरुवात शिवमंदिरापासून झाली. यावेळी डॉ. अमर आडके यांनी उपस्थित शिवप्रेमींना पन्हाळगडाचा इतिहास सांगितला. पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा रूपाली रवींद्र धडेल, उपनगराध्यक्ष हारुणशेठ नूरमहंमद मुजावर, पन्हाळ्याचे तहसीलदार राम चोबे, पन्हाळ्याचे नायब तहसीलदार अनंत गुरव, पन्हाळ्याचे प्रशासकीय वनाधिकारी प्रशांत तेंडुलकर, हॉटेल मालक संघटनेचे सचिन शानबाग यांच्या उपस्थितीत शिवमूर्तीचे पूजन होऊन दीपोत्सवास प्रारंभ झाला. या ठिकाणी श्रीमंत योगी मर्दानी आखाडा, कोल्हापूर यांनी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर केली. 

टॅग्स :Fortगडdiwaliदिवाळी