शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

सहकार शुद्धिकरणाची ‘दादा’गिरी थंडावणार

By admin | Updated: July 18, 2016 01:10 IST

चंद्रकांतदादांना बढती : सहकारसम्राटांनी सोडला नि:श्वास; चौकशीच्या फेऱ्यातून सुटका?

राजाराम लोंढे / कोल्हापूर चंद्रकांतदादा पाटील यांना महसूलमंत्रिपदी बढती मिळाल्याने सहकारातील दिग्गजांनी काहीसा नि:श्वास सोडला आहे. पावणेदोन वर्षे मंत्री पाटील यांनी सहकारातील स्वाहाकाराला लगाम लावत चौकशीचा ससेमिरा मागे लावल्याने संस्थाचालक मेटाकुटीला आले होते. सहकारमंत्री सुभाष देशमुख हे स्वत: सहकार नेते असल्याने दादांच्या ताकदीने काम करण्यावर त्यांच्यावर मर्यादा येण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळात मंत्र्यांचा कोणत्या क्षेत्राचा अभ्यास अधिक आहे, त्याची आवक पाहूनच खाते वाटप केले जाते. त्यामुळे आघाडी सरकारच्या काळात पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील या दिग्गजांचीच सहकारमंत्री म्हणून वर्णी लागली. भाजपचे सरकार सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिगर संस्थाचालकच राज्याचा सहकारमंत्री असेल, अशी घोषणा केली होती. त्यानुसार चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर ही जबाबदारी सोपवली. दादांनी गेली पावणेदोन वर्षे सहकार शुद्धिकरणाची मोहीम हाती घेतली होती. पहिल्यांदा त्यांनी संपूर्ण राज्यातील संस्थांचे सर्वेक्षण करून बोगस संस्था बंद करण्याचे आदेश दिले. केवळ मतांसाठी काढलेल्या संस्था अवसायनात काढून सहकारसम्राटांना दादांनी पहिला हादरा दिला. ज्या बँकांच्या संचालक मंडळावर रिझर्व्ह बॅँकेने कारवाई केली, त्या संचालकांना पुन्हा निवडणूक लढविता येणार नाही, असा वटहुकूम काढला. यामुळे दोन्ही काँग्रेसचे दिग्गज नेते चांगलेच अडचणीत आले आहेत. राज्य बँकेच्या माध्यमातून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विजयसिंह मोहिते-पाटील, हसन मुश्रीफ, लक्ष्मण पाटील यांच्यासह अनेक नेत्यांची पदे धोक्यात आली आहेत. वटहुकुमाला विधानपरिषदेत मान्यता मिळाली नसल्याने दादांनी नव्याने वटहुकूम काढला आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असले तरी कारवाईची तलवार सहकारसम्राटांच्या डोक्यावर कायम आहे. ‘एफआरपी’चा प्रश्नही चाणाक्षपणे हाताळून कारखानदारांना ‘एफआरपी’ देणे भाग पाडले. ज्यांनी दिली नाही त्यांच्यावर थेट परवाना रद्दची कारवाई पहिल्यांदाच झाल्याने साखर उद्योग हादरून गेला. अनेक सहकारी संस्थांची चौकशी लावून दादांनी आपल्या कामकाजाची दिशा स्पष्ट केली होती. दादांना थोपविण्याचा सगळ्यांनी प्रयत्न केला, पण ते निष्पभ्र ठरले. आतापर्यंत एवढ्या ताकदीने सहकार खात्यात दादांनीच काम केल्याचे सहकारातील तज्ज्ञ खासगीत बोलत आहेत. नवीन सहकारमंत्री सोलापूरचे सुभाष देशमुख यांची ‘लोकमंगल’ संस्थेच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रात ओळख आहे. सहकारातील नेत्यांवरच ही जबाबदारी दिल्याने दादांनी राबविलेली शुद्धिकरणाची मोहीम त्या ताकदीने पुढे जाईल, असे जाणकारांना वाटत नाही. प्रभावी कामाचे बक्षीस ! देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या पावणेदोन वर्षांचा लेखाजोखा मांडताना सर्वांत प्रभावी असे काम सहकार खात्यात झाल्याचे नमूद करावे लागेल. दादा पक्षाध्यक्ष ‘अमित शहा यांचे निकटवर्ती’ म्हणून महसूल खाते मिळाल्याची कितीही चर्चा सुरू असली तरी दादांनी सहकार विभागात केलेल्या आक्रमक कामांची दखल घेऊनच मुख्यमंत्र्यांनी दादांना बढती दिल्याची चर्चा सहकार विभागात सुरू आहे.