शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

‘बाबां’च्या खांद्यावरून ‘दादां’चा निशाणा

By admin | Updated: April 26, 2016 00:44 IST

संजय घाटगे गटाला उभारी : हसन मुश्रीफ यांना रोखण्यासाठी घाटगेंना बळ देण्याची व्यूहरचना

दत्ता पाटील -- म्हाकवे कागल तालुक्यात तीन सहकारी आणि एक खासगी साखर कारखाना कार्यरत असतानाही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी माजी आमदार संजय घाटगे यांना साखर कारखान्यासाठी परवाना देण्याचे सूतोवाच केले आहे. यामागे आमदार हसन मुश्रीफ यांना त्यांच्याच तालुक्यात रोखून त्यांना शह देण्याचाच उद्देश असल्याचे बोलले जात आहे. परंतु, काहीही असले तरी यामुळे तब्बल १७ वर्षे सत्तेबाहेर असतानाही गटाचे अस्तित्व अबाधित राखणाऱ्या माजी आमदार संजय घाटगे गटाला उभारी मिळाली आहे.कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कारभारावरून सध्या चंद्रकांत पाटील आणि आमदार मुश्रीफ यांच्यात कलगी-तुरा रंगला आहे. परस्परांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. मुश्रीफ हे राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे नेते आहेत. त्यांचा जिल्हा बँकेसह महानगरपालिका, जिल्हा परिषद, गोकुळ यासह गडहिंग्लज, आजरा, बिद्री कारखान्यांच्या निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग असतो. त्यामुळे त्यांची ही घोडदौड रोखण्यासाठी त्यांना कागल मतदारसंघातूनच सुरुवात करणे गरजेचे आहे. संजय घाटगे हे सध्या शिवसेनेत आहेत. तरीही ते कोणत्या पक्षात आहेत? त्यांचे कोणाशी किती जिव्हाळ्याचे संबंध आहेत? याचा विचार न करता चंद्रकांतदादांनी केवळ मुश्रीफ यांना रोखण्यासाठी संजय घाटगे यांना बळ देण्याच्या दृष्टीने व्यूहरचना आखल्याचेही बोलले जात आहे.अन्नपूर्णा पाणी योजनेच्या माध्यमातून पिकविलेला लाखभर टन ऊस गाळप करण्यासाठी संजय घाटगे यांना कारखाना काढून देण्याची घोषणा करताना पाटील म्हणाले की, प्रसंगी सहकार कायद्यात तडजोड करावी लागली तरी चालेल परंतु, संजय घाटगे यांना कारखाना देणारच. यामुळे अनेक वर्षांपासून सत्तेपासून दूर असणाऱ्या संजय घाटगे गटात नवचैतन्य पसरले आहे. दरम्यान, आगामी विधानसभेचे उमेदवार असणाऱ्या संजय घाटगे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत भव्य मेळाव्याचे आयोजन केले; तर आमदार हसन मुश्रीफ यांनीही तालुक्याच्या जनसंपर्क दौऱ्याला सुरुवात केली आहे. त्यामुळे आगामी विधानसभेची निवडणूक फार मोठ्या चुरशीने होणार, हे निश्चित. सहकारामुळेच अन्नपूर्णा पाणीपुरवठा योजना होऊ शकली. व्हनाळी, सावर्डे परिसरातील शेतकऱ्यांनी पिकविलेला ऊस वेळेत तुटला जावा, तसेच या शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधता यावी, यासाठी कारखान्याची गरज आहे. आम्हाला सत्ता, संपत्तीपेक्षा जनता हीच सर्वस्व वाटते. त्यामुळे त्यांचे हित जपणे हे आमचे कर्तव्य समजतो.- संजय घाटगे, माजी आमदारत्याचप्रमाणे साके, व्हनाळी, गोरंबे, केनवडे, सावर्डे, सावतवाडी, पिराचीवाडी या डोंगरमाथ्यावर पाण्याची सोय करून हक्काचा ऊस निर्माण करून आता साखर कारखाना निर्माण करण्याचे प्रयत्न घाटगे यांनी सुरू केले आहेत.