शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

दाभोलकरांच्या हौतात्म्याचीही उपेक्षाच

By admin | Updated: August 9, 2014 00:28 IST

‘अंनिस’ आक्रमक : मूग गिळून बसलेल्या लोकप्रतिनिधींवर हमीद यांचा हल्लाबोल

सातारा : ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर विधिमंडळाची दोन अधिवेशने झाली; पण याविषयी प्रश्न विचारावा असे एकाही लोकप्रतिनिधीला वाटले नाही. लोकसभेतही ‘आप’च्या पंजाबमधील खासदाराने प्रश्न उपस्थित केला; पण महाराष्ट्रातील ४८ खासदार मूग गिळून बसले. या निद्रिस्त लोकप्रतिनिधींना आणि मुर्दाड यंत्रणेला समाजानेच आता जागे करावे,’ असा घणाघात डॉ. दाभोलकर यांचे चिरंजीव डॉ. हमीद यांनी केला.अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या स्थापनेला शनिवारी (नऊ आॅगस्ट) पंचवीस वर्षे पूर्ण होत आहेत. वीस आॅगस्टला डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला वर्ष पूर्ण होईल. या पार्श्वभूमीवर आंदोलनाची तीव्रता आणि परिणामकारकता वाढविण्याचा निर्णय ‘अंनिस’ने घेतला असून, त्यासंबंधी माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी समितीचे जिल्हा कार्यवाह प्रशांत पोतदार, कुमार मंडपे उपस्थित होते. गेल्या अडीच महिन्यांपासून केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा तपास सुरू आहे; मात्र त्यातही समाधानकारक प्रगती नसल्याबद्दल तीव्र खेद व्यक्त करून डॉ. हमीद म्हणाले, ‘सीबीआयच्या अधिकाऱ्यांना ‘अंनिस’बद्दल काहीच माहिती नाही. डॉ. दाभोलकर यांच्या विचारांना विरोध करणारे कोण-कोण होते, याची माहिती घेण्यापासून त्यांना सुरुवात करावी लागली. तत्पूर्वी पोलीस तपासात प्रगतीऐवजी ‘प्लँचेट’सारखे वादग्रस्त मुद्देच अधिक चर्चेत आले. त्याविषयीचे सत्यही समाजापर्यंत पोहोचविण्याची सरकारची इच्छा दिसत नाही. विचार मान्य असोत की नसोत, एका सामाजिक कार्यकर्त्याचा खून होणे आणि लोकप्रतिनिधींना त्याचे गांभीर्य नसणे ही बाब चिंता वाटायला लावणारी आहे. डॉ. दाभोलकर फक्त ‘अंनिस’चे नव्हते. समाजासाठी त्यांनी बलिदान केले. त्यामुळे समाजानेच आता शासनकर्त्यांवर दबाव आणला पाहिजे.’ (प्रतिनिधी)