शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

दाभोलकर, पानसरे यांचे खुनी शोधतो!

By admin | Updated: March 16, 2015 23:25 IST

भोंदू ज्योतिषाचा दावा : रत्नागिरीच्या ‘लोलकविद्येचे भूत’ उतरविले

सातारा : डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांचे खुनी लोलकविद्येच्या जोरावर शोधून काढेन, असा सनसनाटी दावा सोमवारी फसवणूकप्रकरणी अटक केल्यानंतर एका भोंदू ज्योतिषाने चक्क पोलिसांसमोरच केला. कथित लोलकविद्येच्या माध्यमातून कोणत्याही समस्येवर तोडगा काढण्याचा दावा करणारा आणि ७२ रोगांचे निवारण मंत्राने करीत असल्याची जाहिरात करणारा हा कथित ज्योतिषी सोमवारी अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात अलगद अडकला.मूल होण्यासाठी मंत्र-तंत्राचे तोडगे सुचवून फसवणूक केल्याच्या आरोपाखाली शाहूपुरी पोलिसांनी या ज्योतिषास अटक केली आहे. विश्वास भालचंद्र दाते असे त्याचे नाव असून, तो मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातील आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस प्रशांत पोतदार, भगवान रणदिवे, श्रीनिवास जांभळे हे विविध समस्या घेऊन दातेच्या यादोगोपाळ पेठेतील कार्यालयात पूर्वीच जाऊन आले होते. सोमवारी सकाळी पोलिसांच्या मदतीने सापळा रचून दातेचा पर्दाफाश करण्याची तयारी केली. पोतदार यांनी आपल्याला मूल होत नसल्याचे दातेला सांगितले होते. त्याने पोतदार यांना पत्नीसह बोलावले होते. अडीचशे रुपये दक्षिणाही सांगितली होती. त्यानुसार ‘अंनिस’ कार्यकर्ते आणि पोलिसांनी चतुराईने योजना आखलीस्थानिक गुन्हे शाखेतील महिला कॉन्स्टेबल मोनाली निकम या पोतदार यांच्यासोबत गेल्या. त्यांची ओळख पोतदार यांच्या पत्नी म्हणून करून देण्यात आली. परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक नितीन जाधव हे पोतदार यांचा ‘मेहुणा’ बनून सोबत गेले. बारा वर्षे झाली तरी मूल होत नाही, तसेच आपल्याला दारूचे व्यसन आहे, असेही पोतदार यांनी दातेला सांगितले. यावर दातेने अजब ‘उपाय’ सांगितले; तसेच आपला आत्मा पोतदार यांच्या घरी आणि मूळ गावीही ‘जाऊन आल्याचे’ सांगितले. लोकविद्येच्या बळावर सर्व समस्यांवर उपाय करीत असल्याचा दावा त्याने वारंवार केला. नंतर पोलीस आणि कार्यकर्त्यांनी आपले मूळ रूप उघड केले आणि दातेला ताब्यात घेतले. बाहेर उभे असलेले कार्यकर्ते त्याच वेळी आत गेले आणि दाते अलगद जाळ्यात सापडला. शाहूपुरी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध दैवी औषध आणि उपचार जाहिरात प्रतिबंधक कायदा तसेच भारतीय दंडविधानाच्या कलम ४२० अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलीस ठाण्यात दातेने अजब दावा केला. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या तपासात प्लँचेट झाल्याचे कथित प्रकरण गाजले असतानाच, ‘दाभोलकरांसह कॉ. गोविंद पानसरे यांचे खुनीही मी लोलकविद्येच्या मदतीने शोधून काढून दाखवेन,’ असे तो पोलिसांसमोरच म्हणाला. (प्रतिनिधी)