शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

दाभोळकर कॉर्नर येथील कार्यालयास आग लागून लाखाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 14:45 IST

कोल्हापूरात स्टेशन रोडवरील दाभोळकर कॉर्नर येथील वकीलाच्या कार्यालयास आग लागून लाख रुपयाचे नुकसान झाले. आगिमध्ये फर्निचर, न्यायालयाची महत्वाची कागदपत्रके, फाईली, विद्युत साहित्याचा समावेश आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली

कोल्हापूर : स्टेशन रोडवरील दाभोळकर कॉर्नर येथील वकीलाच्या कार्यालयास आग लागून लाख रुपयाचे नुकसान झाले. आगिमध्ये फर्निचर, न्यायालयाची महत्वाची कागदपत्रके, फाईली, विद्युत साहित्याचा समावेश आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

अधिक माहिती अशी, दाभोळकर कॉर्नर येथील ‘प्रभाकर प्लाझा’ मध्ये दूसºया मजल्यावर अ‍ॅड. उमेश शिवकुमार मानगावे (रा. परिख पुल परिसर, राजारामपूरी) यांचे कार्यालय आहे. मंगळवारी कार्यालयास सुट्टी असल्याने ते दिवसभर बंद होते. रात्री अचानक कार्यालयातून धुराचे लोट बाहेर पडू लागले. शेजारील लोकांना आग लागल्याचे समजताच त्यांनी अग्निशामक दलास फोनवरुन वर्दी दिली.

काही क्षणातच पाण्याचे दोन बंब घेवून जवाण नवनाथ साबळे, पुंडलिक माने, सुरेश पाटील, शिवाजी खेडकर, हेमंत कार्ले दाखल झाले. त्यांनी दरवाजा तोडून आतमध्ये पाहिले असता आगीचे व धुराचे लोट मोठ्या प्रमाणात दिसले. कार्यालयातील संपूर्ण साहित्य  खाक झाले होते.

या कार्यालयाच्या शेजारी अन्य कार्यालये होती. त्यामुळे ही आग तत्काळ आटोक्यात आनने गरजेचे होते. येथील विद्युत पुरवठा बंद करुन पाण्याच्या फवारे मारुन आग विझवली. आगीमध्ये लाकडी फर्निचर, न्यायालयाचे कागदपत्रके, विद्युत साहित्य असे सुमारे एक लाख रुपयांचे साहित्याचे नुकसान झाले.