शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
2
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
3
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
4
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
5
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
6
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
7
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
8
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
9
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
10
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
11
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
12
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
13
काळजी घ्या! मार्केटमध्ये नवीन स्कॅम आला, व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका पाठवून बँक खाते रिकामे करतात
14
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
15
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
16
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न
17
पोस्ट ऑफिसचा मोठा निर्णय, अमेरिकेत जाणाऱ्या पार्सलवर बंदी! फक्त 'या' गोष्टींना सूट मिळणार
18
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
19
मैत्रिणीसोबत थांबला होता फ्लॅटमध्ये, तरुणाने अचानक ३२व्या मजल्यावरून मारली उडी
20
IB Recruitment: गुप्तचर विभागात ज्युनियर ऑफिसर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या ५७ विद्यार्थ्यांना डीएक्ससी टेक्नॉलॉजीमध्ये नोकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:24 IST

डी. वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या २०२२ बॅचसाठीचा प्लेसमेंट सिझन नुकताच सुरू झाला आहे. या बॅचच्या विद्यार्थ्यासाठी महाविद्यालयाने पहिला दिवस 'डीएक्ससी ...

डी. वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या २०२२ बॅचसाठीचा प्लेसमेंट सिझन नुकताच सुरू झाला आहे. या बॅचच्या विद्यार्थ्यासाठी महाविद्यालयाने पहिला दिवस 'डीएक्ससी टेक्नोलॉजी'साठी दिला होता. पहिल्या दिवशी विविध शाखांमधील १५३ विद्यार्थी अंतिम फेरीसाठी पात्र ठरले होते. यामधील ५७ विद्यार्थ्याची कंपनीने नोकरीसाठी निवड केली आहे. या विद्यार्थ्यांना चार लाख रुपयांचे पॅकेज देण्यात आले असल्याची माहिती कार्यकारी संचालक डॉ. अनिल कुमार गुप्ता व प्राचार्य डॉ. संतोष चेडे यांनी दिली. या कंपनीत निवड झालेल्यांमध्ये कॉम्प्युटर सायन्स विभागातील ३०, मॅकेनिकल विभागातील १५, इलेक्ट्रोनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातील १० व केमिकल विभागातील २ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. २०२२ बॅचच्या विद्यर्थ्यांसाठी येत्या १५ दिवसात आणखी ५ कंपन्यांचा प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित करण्यात आला आहे. या सर्व कंपन्यात मिळून २०० हून अधिक विद्यार्थ्याना नोकरीची संधी मिळेल, असा विश्वास डॉ. गुप्ता यांनी व्यक्त केला.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांशी संस्थेचे विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील यांनी संवाद साधत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना अधिष्ठाता डॉ. क्षमा कुलहल्ली, प्रा. सुदर्शन सुतार, राधिका ढणाल यांचे विशेष सहकार्य लाभले.

कोट : सर्वागीण विकासावर भर

डी. वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रथम वर्षापासूनच व्यक्तिमत्त्व विकास विषय अनिवार्य केला आहे. विविध सॉफ्ट स्कील ट्रेनिंगही दिली जातात. मिळालेले हे यश म्हणजे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयाकडून केले जात असलेले प्रयत्न आणि विद्यार्थी व प्राध्यापकांच्या कष्टाची पोहचपावती आहे. आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त, डी. वाय. पाटील ग्रुप.

फोटो : २९ डीवायपी

डीएक्ससी टेक्नॉलॉजीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांसमवेत विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, डॉ. क्षमा कुलहल्ली, प्रा. सुदर्शन सुतार, राधिका ढणाल, मकरंद काईंगडे व प्राध्यापक.