शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

‘ग्रीन कोल्हापूर’साठी रविवारी सायकल राईड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 00:28 IST

कोल्हापूर : आपलं कोल्हापूर कचरामुक्त आणि खऱ्या अर्थाने ग्रीन करण्यासाठी प्रदूषण कमी करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे. त्यामुळे शहर ...

कोल्हापूर : आपलं कोल्हापूर कचरामुक्त आणि खऱ्या अर्थाने ग्रीन करण्यासाठी प्रदूषण कमी करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे. त्यामुळे शहर कचरामुक्त करण्यासाठी प्रदूषण कमी करण्याचे आवाहन करण्यासाठी ‘लोकमत’ने ‘ग्रीन कोल्हापूर सायकल राईड’ रविवारी (दि. २५) सकाळी साडेसहा वाजता आयोजित केली आहे. या राईडमध्ये सहभागी होऊन या पर्यावरणपूरक उपक्रमाला कोल्हापूरकरांनी साथ द्यावी.‘लोकमत’ नेहमीच कोल्हापूरसाठी विविध सामाजिक उपक्रम राबविते. त्याअंतर्गत आता ‘कचरामुक्त आणि ग्रीन कोल्हापूर’ची साद दिली आहे. ‘लोकमत’ने ‘ग्रीन कोल्हापूर सायकल राईड’ आयोजित केली आहे.ही राईड रविवारी (दि. २५) सकाळी साडेदहा वाजता हॉटेल सयाजीमधील साज लॉनपासून सुरू होणार आहे. त्यामध्ये सहभागी होण्यासाठी ५० रुपये, तर शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ३० रुपये प्रवेश शुल्क आहे. त्यामध्ये सहभागी होणाºया प्रत्येकाला सायकल फ्लॅग, बीब नंबर, नाष्टा, एनर्जी ड्रिंक आणि सहभाग प्रमाणपत्र मिळणार आहे.राईडची सुरुवात होण्यापूर्वी झुंबा वर्कआऊट सेशनदेखील होणार आहे. या राईडचे प्रायोजक हॉटेल सयाजी, तर सहप्रायोजक चाटे शिक्षण समूह आहे, तर नॉर्थस्टार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, ‘डीवायपी’ वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड, रेडिओ मिर्ची, दोशी सायकल, कोल्हापूर स्पोर्टस् क्लब, एक्स्पोलर कोल्हापूर आणि कोल्हापूर सायकलिंग क्लब यांचे सहकार्य लाभले आहे. या राईडमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.कोल्हापुरात पहिल्यांदाच आयोजनअशा स्वरूपातील सायकल राईड या अधिकतर मुंबई, बंगलोर, पुणे, आदी मेट्रोसिटीमध्ये आयोजित केल्या जातात. मात्र, ‘लोकमत’ने पहिल्यांदाच कोल्हापुरात ‘ग्रीन कोल्हापूर सायकल राईड’ आयोजित करून शहरवासीयांना एक अनोखी संधी उपलब्ध करून दिली आहे.सायकल राईडचा मार्ग असाहॉटेल सयाजी साज लॉन, टेंबलाई उड्डाणपूल, केएसबीपी पार्क, शाहू टोलनाका, शिवाजी विद्यापीठ कॅम्पस ते पुन्हा टेंबलाई केएसपीबी पार्क, टेंबलाई उड्डाणपूल, हॉटेल सयाजी असा या सायकल राईडचा मार्ग आहे.आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधीया सायकल राईडनिमित्त ‘बेस्ट स्लोगन’, ‘बेस्ट ड्रेसअप’, ‘बेस्ट सायकलिस्ट’ आणि जास्तीत जास्त सहभाग ग्रुप नोंदणी स्पर्धा घेण्यात येणार आहे. त्यातील विजेत्यांना आकर्षक सन्मानचिन्ह आणि बक्षिसे मिळणार आहेत.या राईडमधील सहभागासाठी नावनोंदणीकरिता ‘लोकमत’ शहर कार्यालय, ‘डीवायपी सिटी’, राजारामपुरीतील दोशी सायकल अथवा (९६०४६४४४९४/ ७९७२३९२०२५) या क्रमांकांवर संपर्क साधावा.