कोल्हापूर : भारतातील अग्रेसर शेड्युल्ड कमर्शियल बँक म्हणून ओळख असलेल्या आर. बी. एल. बँक (रत्नाकर बँक) आणि इक्शा फौंडेशन यांनी संयुक्त विद्यमाने सायक्लोथॉनचे आयोजन केले आहे. रेटिनो ब्लास्टोमा या डोळ्यांच्या कॅन्सरने बाधित मुलांसाठी निधी उभा करण्याच्या हेतूने आयोजित ही सायक्लोथॉन आर.बी.एल. बँकेच्या मुंबई ते बंगलोरपर्यंतच्या शाखांना भेट देणार आहे. दरम्यान, सोमवारी ताराबाई पार्क येथील विजयराज हॉटेलशेजारील आर.बी.एल. बँकेच्या शाखेतून ही रॅली अभिनेत्री श्वेता शिंदे यांच्या हस्ते बेळगावकडे रवाना झाली. पनवेल शाखेतून या उपक्रमाची सुरुवात अभिनेत्री तमन्ना भाटिया यांच्या हस्ते आर.बी.एल. बँकेच्या परिसरातून केली. कॉर्पोरेट प्रोफेशनल जसमितसिंग गांधी यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम होत आहे. हजार किलोमीटरचे अंतर पार करणार आहे. बेळगाव येथे क्लब रोड ब्रॅँचचे पार्लमेंट मेंबर प्रभाकर कोरे यांच्या हस्ते रॅलीला ध्वज दाखवण्यात येणार आहे. रविवारी (दि. २३) ती बंगलोर येथील नारायण नेत्रालय हॉस्पिटल येथे जाईल. कॉर्पोरेट अफेअर्सच्या प्रमुख शांता वेलुरी-गांधी म्हणाल्या, ‘सीएसआर’ हा केवळ एक उपक्रम न राहता जीवनपद्धती बनली पाहिजे.
‘कॅन्सरबाधित’ निधीच्या सायकल रॅलीस प्रतिसाद
By admin | Updated: November 20, 2014 00:03 IST