शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

ऊस दराची फाळणी तापदायकच !

By admin | Updated: January 19, 2016 23:46 IST

साखरेची कडू कहाणी : उत्पादक शेतकऱ्यांसमोर अडचणींचा डोंगर भलामोठाच..‘एफआरपी’च्या नावानं चांगभलं- एक

संजय कदम -- वाठार स्टेशन -जाहीर एफआरपी हाच ऊसदर म्हणून यापुढे सर्वांना मान्य करावा लागणार असल्याने ऊसदराची ही फाळणी शेतकऱ्यांना परवडणारी असेल का? या धोरणात कारखानदारी टिकावी आणि शेतकरीही समाधानी राहावा, असे काही धोरणात्मक बदल आवश्यक आहेत.दिवसेंदिवस ऊसदर किती आणि कसा द्यावा हा एक अत्यंत वादाचा विषय झाला आहे. प्रतिवर्षी ऊसदरासाठी होणाऱ्या हिंसक आंदोलनातून कारखानदारांचा आवाज फोडण्याचे काम आजपर्यंत शेतकरी संघटनांच्या माध्यमातून घडत आले; परंतु गेल्या दोन वर्षांपासून ऊसदरासाठीची आंदोलने थांबली आणि सामान्य शेतकरी शासनाच्या एफआरपीचा वाट बघू लागला, मग एफआरपी तरी एकरकमी द्या,’ यासाठी शेतकरी संघटना शासनावर दबाव आणू लागल्याने शासनाने या नियमात बदल घडवून याचे दोन भाग केले आणि ८०-२० असा ऊसदराचा नवा फॉर्म्युला जाहीर केला. ऊसपीक आणि गहू, ज्वारी, सोयाबीन, भात या शेतीमाला मध्ये मूलत: एक फरक आहे. ऊस हे प्लँटेशन क्रॉप पद्धतीचे नाशवंत पीक आहे. यामुळे उसाची काही तासांत प्रक्रिया करणे गरजेचे असते. त्याची साठवण करून ठेवता येत नाही याऊलट गहू, ज्वारी, सोयाबीन, भात या पिकांची साठवण करून योग्य वेळी बाजारपेठेत पाठविणे शक्य असते, यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वेगळ्या आहेत. काही आर्थिकदृष्ट्या मजबूत शेतकरी उसापासून गुळाचे उत्पन्न घेतात; पण याबाबतही बाजारपेठेत अस्थिरता आहे. यामुळे गुऱ्हाळ घरांची संख्या मर्यादित आहेत. गुऱ्हाळ एकटा शेतकरी निर्माण करू शकतो; पण साखर कारखाने उभारणे एकट्या शेतकऱ्याचे काम नाही. त्यामुळे अनेक शेतकरी एकत्रित येऊन सहकारी कारखान्याचा उदय झाला.कारखाने चार ते सहा महिने चालतात. तयार होणारी साखर पुढे वर्षभर विकली जाते. साखरनिर्मिती बरोबरच इतर उपपदार्थ तयार होतात. या सर्वातून मिळणाऱ्या उत्पन्नातून ऊस हंगामातील तोडणी वाहतूक कर्मचारी पगार वजा करून राहिलेली रक्कम ही ऊस उत्पादकांना द्यावी, अशीच पद्धत आहे. असे असताना मग आता सुरुवातीलाच उसाचा दर कसा काय निश्चित होऊ लागला? असा प्रश्न कारखानदारांचा आहे.ऊस दर आधी कसा?राज्यातील जवळपास सर्वच कारखान्यांमध्ये सर्व खर्च वजा करून राहिलेली रक्कम उस उत्पादकांना देण्याची पध्दत आहे. हीच पध्दत सातारा जिल्ह्यातही पहायला मिळत होती. मात्र, आता सुरूवातीलाच उसाचा दर जाहीर करणं कारखान्यांना कसे जमू लागले आहे, असा प्रश्न सामान्य ऊस उत्पादकांना पडत आहे.