शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या ‘त्या’ ग्राहकांना मिळणार व्याजासह परतावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 05:22 IST

नवीन वीज जोडणी देताना महावितरण कंपनीने खांब व नवीन तारा टाकण्यासाठी तसेच खांबापासून मीटरपर्यंत तारा जोडणे आणि मीटरचे पैसे संबंधित ग्राहकाकडून घेतले होते.

इचलकरंजी (जि.कोल्हापूर) : नवीन वीज जोडणी देताना महावितरण कंपनीने खांब व नवीन तारा टाकण्यासाठी तसेच खांबापासून मीटरपर्यंत तारा जोडणे आणि मीटरचे पैसे संबंधित ग्राहकाकडून घेतले होते. या वीजग्राहकांना व्याजासह त्यांची रक्कम परत करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असून परतावा देण्याचे परिपत्रक महावितरणने जारी केले आहे.नवीन जोडणी देण्यासाठी विजेचे खांब व तारा टाकावयाच्या असतील तर त्याचा खर्च ओआरसी किंवा ओआरसीपी या नावाखाली संबंधित वीज ग्राहकाकडून जानेवारी २००५पासून आकारला जात असे. तसेच सप्टेंबर २००६नंतर नवीन जोडणी देण्यासाठी खांबापासून मीटरपर्यंत तार टाकण्यासाठी (सर्व्हिस लाईन चार्ज) व मीटरची किंमत महावितरणने घेतली होती. याच्याविरोधात वीज कायद्यान्वये ऊर्जा नियामक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.महाराष्टÑ वीज ग्राहक संघटनेने दाखल केलेल्या या तक्रारीवर सुनावणी होऊन १७ मे २००७ व २१ आॅगस्ट २००७ रोजीच्या निकालाप्रमाणे सर्व वीज ग्राहकांना व्याजासह पूर्ण रक्कम परत करावी, असे आदेश ऊर्जा नियामक आयोगाने महावितरणला दिले होते. मात्र, महावितरणने याच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागितली. सर्वोच्च न्यायालयातसुद्धा वीज ग्राहकांच्याच बाजूने निर्णय दिला. म्हणजे ऊर्जा नियामक आयोगाचा निकाल कायम ठेवला. ही न्यायालयीन लढाई वीज ग्राहक संघटनेने तब्बल दहा वर्षे लढली.आता महावितरण कंपनीने एक परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकाप्रमाणे महावितरण कंपनीने म्हटले आहे, २० जानेवारी २००५ ते ३० एप्रिल २००७ या कालावधीमध्ये नव्याने जोडणी दिलेल्या ज्या ग्राहकांकडून ओआरसी किंवा ओआरसीपी, तसेच एसएलसी व मीटरची किंमत घेतली आहे, त्या ग्राहकांना हा परतावा द्यावा, असेही या पत्रकात नमूद केले आहे.राज्यातील अशा वीज ग्राहकांना सुमारे ९०० कोटी रुपये परतावा मिळणार आहे.