शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

बँक अधिकाऱ्यांच्या मनमानी विरोधात ग्राहक आक्रमक

By admin | Updated: January 6, 2015 21:53 IST

ठिकपुर्लीतील प्रकार : देना बँकेला ठोकले ताळे

तुरंबे : राधानगरी तालुक्यातील ठिकपुर्ली येथील देना बॅँकेचे शाखाधिकारी अनिल डी. शहा हे ग्राहकांशी उद्धट वर्तन करतात व अपमानास्पद वागणूक देतात याच्या निषेधार्थ बॅँकेच्या ग्राहक व खातेदारांनी शाखेसमोर आंदोलन करून शहा यांच्या बदलीची मागणी केली व बॅँकेस टाळे ठोकले.ठिकपुर्ली (ता. राधानगरी) येथे देना बॅँकेची शाखा आहे. या बॅँकेतून ठिकपुर्लीसह परिसरातील शेतकरी व ग्राहकांच्या आर्थिक देवघेवीचे व्यवहार होतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून या शाखेचे अधिकारी अनिल शहा हे ग्राहकांना योग्यरीतीने सेवा पुरवत नाहीत, तसेच ते ग्राहकांशी व महिला बचत गटांच्या महिलांंशी उद्धट पद्धतीने बोलतात, असा अनेकांचा आक्षेप आहे. अपमानास्पद वागणूक देतात, निरीक्षर लोकांना माहिती द्यायला टाळाटाळ करतात, अशा तक्रारीदेखील ग्रामस्थांनी शाखेच्या दारात बोलून दाखविल्या. आज, मंगळवारी सकाळी दहा वाजता संतप्त ग्रामस्थ व बॅँकेच्या ग्राहकांनी बॅँकेच्या शाखेला टाळे ठोकले. यावेळी ग्रा.पं.सदस्या नूतन बाबासाहेब पाटील, राजेंद्र कांबळे, सरपंच चंद्रकांत संकपाळ, पं.स. सदस्य प्रल्हाद पाटील, उपसरपंच रणजित पाटील, माजी सरपंच राजू चौगले, रघुनाथ चौगले, पांडुरंग देवकर, सुनीता पडळकर, महादेव एकल, आदी उपस्थित होते. चर्चेनंतर बँकेचे टाळे उघडण्यात आले व व्यवहार सुरळीत झाले. यावेळी ग्राहकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. ग्रा.पं.सदस्या नूतन पाटील म्हणाल्या, शाखाधिकारी बचत गटांच्या महिलांशी उद्धट शब्दांत बोलतात. महिलांना अपमानास्पद वागणूक देतात. निरक्षर लोकांना सेवा व्यवस्थित देत नाहीत. (वार्ताहर)बॅँकेला शिस्त लावण्यासाठी मी केलेली कार्यवाही ग्राहकांना रूचली नाही. सप्टेंबरपासून मी या शाखेकडे काम करतो. ग्राहकांशी संबंधित केलेल्या कायदेशीर बाबी लोकांना मान्य नसल्याने लोकांचा रोष पत्करावा लागला. अनिल शहा,देना बॅक, शाखाधिकारी.