शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

वस्त्रोद्योगामध्ये अर्थसंकल्पाबाबत उत्सुकता

By admin | Updated: February 1, 2017 01:05 IST

मंदीची पार्श्वभूमी : कापूस, सूत धोरणाबरोबर यंत्रमाग आधुनिकीकरणाची अपेक्षा

इचलकरंजी : वस्त्रोद्योगात असलेल्या मंदीच्या पार्श्वभूमीवर आज, बुधवारी घोषित होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत कमालीची उत्सुकता लागून राहिली आहे. वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे ‘टफ्स’चे वाढीव अनुदान, कापूस, सूत, कापड यांचे आयात-निर्यात धोरण, आयातीत कापडावर अ‍ॅँटी डंपिंग ड्युटी, यंत्रमागाचे रॅपियर लूममधील रूपांतरासाठी अनुदान, अशा तरतुदींचा अर्थसंकल्पात अंतर्भाव होण्याची शक्यता आहे.साधारणत: दोन वर्षांपासून वस्त्रोद्योगामध्ये मंदीचे वातावरण आहे. वस्त्रोद्योगामधील सूतगिरण्या, यंत्रमाग, कापड प्रोसेसिंग, गारमेंट, असे सर्व घटक आर्थिक मंदीमध्ये भरडले जात आहेत. यातील यंत्रमाग व्यवसाय हा सुलभपणे आणि अधिक रोजगार उपलब्ध करून देणारा उद्योग असल्यामुळे या उद्योगाकडे सरकारने विशेष लक्ष दिले पाहिजे, अशी पूर्वीपासूनची अपेक्षा आहे; पण मंदीच्या वातावरणामुळे यंत्रमाग उद्योग अधिकच कमकुवत होत गेला. त्यातील जॉबवर्क करणाऱ्या यंत्रमागधारकांची परिस्थिती एकदम खालावल्यामुळे आॅगस्ट महिन्यात इचलकरंजीतील एका खर्चीवाल्या (जॉबवर्क) यंत्रमागधारकाने आत्महत्या सुद्धा केली होती. टफ्स अनुदानात वाढ होण्याची अपेक्षावस्त्रोद्योगामधील विणकाम घटकाचे आधुनिकीकरण होण्यासाठी उद्योजकांना सहायभूत ठरणाऱ्या तांत्रिक उन्नयन योजनेंतर्गत (टफ्स) मिळणारे अनुदान तीस टक्क्यांपर्यंत वाढविण्यात येईल. त्याचबरोबर साध्या यंत्रमागाचे रॅपियर लूममध्ये रूपांतर करण्यासाठी सरकारकडून अनुदानाची तरतूद होईल. कापूस, सूत आणि कापड यांच्या आयात-निर्यात धोरणाबरोबरच आयातीत कापडावर अ‍ॅँटी डंपिंग ड्युटीमध्ये वाढ होईल, अशी अपेक्षा केंद्रीय अर्थसंकल्पापासून असल्याची माहिती खासदार राजू शेट्टी यांनी दिली.सुताचा जीवनावश्यक वस्तूत अंतर्भावकापड उत्पादनासाठी लागणाऱ्या सुताचा अंतर्भाव जीवनावश्यक वस्तू म्हणून करण्याबरोबरच सुताच्या बाचक्यांवर (पॅकिंग) कमाल किंमत छापण्याची सरकारकडून सक्ती करण्यात येईल. तसेच देशपातळीवर यंत्रमाग क्षेत्रासाठी विजेचा एकच दर ठेवण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारना मदत करेल आणि आयातीत सुतावरील कर कमी होईल, अशी आशा केंद्रीय अर्थसंकल्पापासून यंत्रमागधारकांना आहे, असे इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी यांनी सांगितले.