शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कामबंदचा ‘क्रिडाई’चा इशारा; निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

By admin | Updated: July 18, 2014 00:56 IST

सिमेंटची अन्यायकारक दरवाढ मागे घ्या

कोल्हापूर : सिमेंट कंपन्यांनी प्रती पोत्यामागे ७० ते ८० रुपयांची केलेली दरवाढ अन्यायकारक आहे. त्यामुळे बांधकाम तसेच घरांच्या किमतीत वाढ होणार आहे. त्यामुळे सिमेंटची दरवाढ मागे घेण्याबाबत शासनाने लक्ष द्यावे, या मागणीचे निवेदन ‘क्रिडाई’ कोल्हापूरतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांना देण्यात आले. निवेदनात असे म्हटले आहे की, सिमेंट उत्पादन करणाऱ्या विविध कंपन्यांनी केलेल्या दरवाढीमुळे २२५ ते २५० रुपयांपर्यंत असलेल्या सिमेंट पोत्यांची किंमत ३१० ते ३६० रुपये इतकी झाली आहे. ही दरवाढ कृत्रिम स्वरूपातील आहे. त्याचा फटका बांधकाम व्यावसायिक, ठेकेदार, स्वमालकीचे घर बांधणाऱ्यांना बसणार आहे. यामुळे बांधकामाची किंमत प्रती चौरस फूट ६० ते ७० रुपयांनी वाढणार आहे. शासनाने या सिमेंट कंपन्यांच्या नफेखोरीस आळा न घातल्यास या दरवाढीमुळे सर्वसामान्यांना घर बांधणे आणि बांधकाम व्यावसायिकांना योग्य दरामध्ये घरांचा पुरवठा करणे अशक्य होणार आहे. त्यामुळे अन्यायकारक दरवाढ मागे घेण्याबाबत शासनाने लक्ष द्यावे. या कृत्रिम दरवाढीचा ‘क्रिडाई’च्या माध्यमातून बांधकाम व्यावसायिक तीव्र निषेध करत आहेत. शासनाने याबाबत सकारात्मक विचार न केल्यास सर्व बांधकाम व्यावसायिकांकडून कामबंद आंदोलन करण्यात येईल. या शिष्टमंडळात क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष गिरीश रायबागे, दिलीप जाधव, नितीन जिरगे, राजीव परीख, महेश यादव, हेमांग शहा, विलास रेडेकर, चेतन चव्हाण, संदीप मिरजकर, पारस ओसवाल, विद्यानंद बेडेकर, आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)