शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकर्त्यांच्या सोयीसाठी अशासकीय मंडळांची खिरापत

By admin | Updated: August 9, 2014 00:27 IST

बाजार समिती : राज्यातील २८ समित्यांची यादी तयार

राजाराम लोंढे - कोल्हापूर -आगामी विधानसभा निवडणुकीतील बेरजेच्या राजकारणासाठी कार्यकर्त्यांना खूश करण्यासाठी बाजार समित्यांवर अशासकीय मंडळ नियुक्तीचा सपाटा राज्य शासनाने लावला आहे. सध्या चार बाजार समित्यांवर या मंडळांच्या नियुक्त्या केल्या असल्या तरी आचारसंहितेपूर्वी प्रशासक असलेल्या आणखी २८ ते २९ बाजार समित्यांवर अशासकीय मंडळाची नियुक्ती करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. संचालकांचे प्रतिनिधीच मागील दाराने आत आल्याने बाजार समित्यांमध्ये पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या...’, अशी परिस्थिती निर्माण होण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. कोल्हापूर बाजार समितीच्या संचालकांच्या कारभारामुळे अकरा महिन्यांपूर्वी प्रशासकांची नियुक्ती झाली. अजूनही संचालकांच्या कारभाराची चौकशी व कारवाई सुरूच आहे. मध्यंतरी प्रशासकांना हटवून संचालकांना बसविण्याचा प्रयत्न सुरू होता. त्यासाठी पणन मंडळाने फेरचौकशीचे आदेश दिले होेते. यामध्ये संचालकांना ‘क्लीन चिट’ देण्याचा प्रयत्नही सुरू होता; पण संबंधित अधिकाऱ्यांनीच चौकशी करण्यास नकार दिल्याने फेरचौकशी मागे पडली. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही लागू शकते. पुन्हा आपली सत्ता येईल की नाही, याबाबत दोन्ही कॉँग्रेसला साशंकता आहे. तोपर्यंत आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांना संधी द्यायची, यासाठीच त्यांनी हा समझोता केला आहे. राज्यातील ३०० पैकी तब्बल ४२ बाजार समित्यांवर प्रशासक आहे. या समित्यांवर कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसची सत्ता आहे. यातील बहुतांश बाजार समित्या या राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या ताब्यात आहेत. प्रशासक असल्याने कार्यकर्ते मोकळे आहेत. यामुळेच महामंडळावर नियुक्तीसाठी दोन्ही काँग्रेसकडे गर्दी दिसते. त्यात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचा रोष परवडणारा नसल्याने सत्ताधाऱ्यांनी ही सोय केल्याचे बोलले जात आहे. अधिकारांचा दुरुपयोग!बाजार समितीवर १९८४ ते ८६ या काळात प्रशासक होते. दोन वर्षे पाच महिने प्रशासक मंडळ राहिल्यानंतर निवडणूक लागली होती. परंतु, यावेळी अशासकीय मंडळाची नियुक्ती करून शासनाने अधिकारांचा दुरुपयोग केल्याचे बोलले जाते.